राज्यभरात आजपासून पॅट परीक्षा सुरू

राज्यभरात आजपासून पॅट परीक्षा सुरू

Published on

राज्यभरात आजपासून पॅट परीक्षा सुरू
राज्यभरातील शाळांची तयारी पूर्ण

मुंबई, ता. ९ ः राज्यातील दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा (पॅट-१) शुक्रवारी (ता. १०) सुरू होत आहे. ती १३ ऑक्टोबरपर्यंत चालेल. या परीक्षेला राज्यभरातून तब्बल ८४ लाख ७८ हजार ८७० विद्यार्थी बसणार असून, यासाठीची लागणाऱ्या प्रश्नपत्रिका शाळांपर्यंत पोहोचविण्यात आल्या असून, यासाठी शाळांचीही तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) दिली.
राज्यातील पॅट-१ अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे. यात यंदाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राज्यातील अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदेच्या विविध माध्यमांच्या शाळांतील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला पायाभूत चाचणीनंतर संकलित मूल्यमापन चाचणी-१ या या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे, तर संकलित मूल्यमापन चाचणी -२ ही पुढील वर्षी एप्रिल महिन्यात घेण्याचे नियोजन आहे.
संकलित मूल्यमापन चाचणी-१मध्ये ग्रेड-२, ग्रेड-३, ग्रेड-४, ग्रेड-५, ग्रेड-६, ग्रेड-७ आणि ग्रेड-८ प्रमाणे सरकारी, अनुदानित शाळांतील विद्यार्थी असतील. यात भाषांमध्ये मराठी विषयांसाठी ७० लाख ९१ हजार ९७८ विद्यार्थी परीक्षा देतील, तर इंग्रजीसाठी ३४ लाख आठ हजार ५९४ आणि सर्वाधिक विद्यार्थी उर्दूतील ७७ लाख पाच हजार ८७८ इतके असतील. यात प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांचा अधिक समावेश आहे. पॅटच्या पायाभूत चाचणी परीक्षेत मोठ्या प्रमाणात प्रश्नपत्रिकांचा अभाव, परीक्षेपूर्वीच पेपरची माहिती यूट्युब चॅनलवर प्रसिद्ध होणे आदी प्रकार समोर आले होते. त्यामुळे मागील परीक्षांचा अनुभव लक्षात घेता प्रत्येक शाळांमध्ये परीक्षेच्या प्रश्नपत्रिका नियोजित पद्धतीने पाठविल्या जाणार असल्याचेही सांगण्यात आले असून, सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आल्याची माहिती एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार यांनी दिली.
...
मुंबई विभागातून चार लाख विद्यार्थी
मुंबईत ही परीक्षा शिक्षण उपसंचालक कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या ७३३ आणि महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या एक हजार ३५७ अशा दोन हजार ९१ शाळांमध्ये होईल. या परीक्षेला मुंबई विभागातून चार लाख २० हजार ९५९ विद्यार्थी बसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com