म्हाडाची संगणकीय सोडत शनिवारी

म्हाडाची संगणकीय सोडत शनिवारी

Published on

म्हाडाची संगणकीय सोडत शनिवारी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा आणि वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५,३५४ सदनिका ७७ भूखंड विक्रीकरिताची संगणकीय सोडत उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी (ता. ११) काढली जाणार आहे.
ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सकाळी ११ वाजता सोडत होणार आहे. या सोडतीसाठी १,८४,९९४ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह १,५८,४२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. कोकण मंडळातर्फे सोडत कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी उपस्थित अर्जदारांना निकाल सुलभतेने पाहता यावा, याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. तसेच अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून https://youtube.com/live/K9bX1SXAESQ0feature=share या लिंकवर व म्हाडाचे अधिकृत फेसबुक https://www.facebook.com/mhadaofficial व https://www.youtube.com/@MHADA OFFICIAL या यूट्युब पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीतील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी सहा वाजेनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतच संदेश त्यांनी अर्जासोबत नोंद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तत्काळ प्राप्त होणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
...
सदनिकांची विभागणी
- कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे.
- २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ सदनिका
- १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३,००२ सदनिका
- म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहेत त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १,७४६ सदनिका
- म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणाऱ्या सदनिका) ४१ सदनिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com