जगात संयुक्त अग्रस्थानासाठी उद्योजकांनी क्षेत्र निवडावे
जगात संयुक्त अग्रस्थानासाठी उद्योजकांनी क्षेत्र निवडावे
अणुऊर्जा क्षेत्र खासगीला खुले करण्याचे मोदींचे सूतोवाच
मुंबई, ता. ९ ः भारताचे अणुऊर्जा क्षेत्र लवकरच खासगी उद्योगांसाठी खुले करण्याचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिटिश उद्योजकांसमोर केले. जगात संयुक्तपणे अग्रस्थानी राहावे, असे एखादे क्षेत्र भारत आणि इंग्लंडच्या उद्योजकांनी निवडावे, असे आवाहनही त्यांनी आज येथे केले.
इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासोबत आलेल्या उद्योजकांच्या शिष्टमंडळासमोर मोदी यांनी हे आवाहन केले. ग्रीन हायड्रोजन, सेमीकंडक्टर, फिनटेक, स्टार्टअप यापैकी कोणतेही क्षेत्र निवडून भारतीय आणि ब्रिटनच्या उद्योजकांनी त्यात अग्रस्थान मिळवावे आणि जागतिक मापदंड निश्चित करावेत. आपण आणि स्टार्मर यांनी व्हिजन २०३५ची घोषणा केली असून त्यातील एकत्रित महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी व्यावसायिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारत व इंग्लंड यांच्यात झालेल्या सीटा कराराची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी व्हावी, यासाठी व्यापार आणि अर्थव्यवस्था, शिक्षण, लोकसंबंध, तंत्रज्ञान व कल्पना आणि महत्त्वाकांक्षा यांच्यावर भर हवा. सध्या दोन देशांमधील द्विपक्षीय व्यापार ५६ अब्ज डॉलरचा असून २०३०पर्यंत तो दुप्पट करण्याचे आमचे लक्ष्य वेळेआधीच साध्य होईल, अशी खात्रीही मोदी यांनी व्यक्त केली. भारतात धोरण स्थिरता आणि सुलभ नियम असून अर्थव्यवस्थेत व्यापक सुधारणा होत आहेत. नियमनांचा जाच कमी होत असून व्यवसाय सुलभता साधण्यावर आम्ही लक्ष देत आहोत. जीएसटी सुधारणांमुळे एम.एस.एम.ई. क्षेत्राला मोठी ताकद मिळाली आहे. यामुळे देशातील संधी वाढत आहेत. पायाभूत सुविधा, औषधनिर्मिती, ऊर्जानिर्मिती, अर्थपुरवठा या क्षेत्रात अनेक संधी आहेत. तर शिक्षण आणि उद्योग यांच्यातील भागीदारी तसेच नवकल्पना या बाबी अर्थव्यवस्थेचा मोठा आधार होतील, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.
...
सहकार्याच्या पुष्कळ संधी
दूरसंचार, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, अवकाश, डिजिटल या क्षेत्रात सहकार्याच्या पुष्कळ संधी उपलब्ध होत आहेत. संरक्षण क्षेत्रातही संयुक्त प्रकल्प उभारण्याची वाटचाल सुरू आहे. आता या संधीचे सहकार्यात रूपांतर करण्यासाठी वेगाने काम करायला हवे. फिनटेक क्षेत्रातील भारताचे सामर्थ्य जगाने पाहिले आहे. सध्या जगातील निम्मे डिजिटल व्यवहार भारतात होत आहेत. ब्रिटनचा वित्त सेवेतील अनुभव आणि भारताचे तंत्रज्ञान एकत्र येऊन सर्व मनुष्यजातीचे कल्याण करू, असा आशावादही मोदी यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.