कर्जत विभागात १९ तासांचा रेल्वे ब्लॉक; डेक्कन क्वीनसह पाच एक्स्प्रेस रद्द
कर्जत विभागात १९ तासांचा रेल्वे ब्लॉक
‘डेक्कन क्वीन’सह पाच एक्स्प्रेस रद्द
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः कर्जत रेल्वे यार्डच्या पुनर्बांधणीसह आधुनिक सिग्नल प्रणालीची कामे हाती घेण्यात आल्याने पळसदरी ते भिवपुरीदरम्यान १९ तासांचा मोठा ब्लॉक ठेवण्यात आला आहे. हा ब्लॉक शुक्रवारी मध्यरात्री १२.२० वाजेपासून रविवारी पहाटे ७.२० वाजेपर्यंत राहणार आहे.
ब्लॉकदरम्यान शनिवारी धावणाऱ्या पाच महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात सीएसएमटी- पुणे- सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस (१२१२५/२६), डेक्कन क्वीन (१२१२३/२४), डेक्कन एक्स्प्रेस (११००८), इंटरसिटी एक्स्प्रेस (१२१२८) आणि इंद्रायणी एक्स्प्रेस (२२१०६) यांचा समावेश आहे.
कोल्हापूर- सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस (११०३०) आणि बंगळुरू-सीएसएमटी उद्यान एक्स्प्रेस (११३०२) या गाड्या पुणेपर्यंतच धावतील. पुणे ते मुंबई हा प्रवास या गाड्यांचा रद्द ठेवण्यात आला आहे. याशिवाय इतर नऊ मेल आणि एक्स्प्रेस गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत.
लोकल सेवा प्रभावित
ब्लॉकदरम्यान काही लोकल गाड्याही रद्द राहतील. त्यामध्ये दुपारी १२.४०ची खोपोली-कर्जत, दुपारी १.१५ची कर्जत-खोपोली, सायंकाळी ६.०२ची खोपोली-सीएसएमटी आणि सायंकाळी ७.४३ची कर्जत-खोपोली या लोकल गाड्यांचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी गाडीची स्थिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.