एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण
एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण
आज उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित थकीत ४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमा मिळाव्यात, यासाठी एसटीमधील वेगवेगळ्या १८ संघटनांनी आंदोलनाच्या नोटीस दिल्या आहेत. या कामगार संघटनांमध्ये या आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ सुरू आहे.
एसटी कामगार संघटना कृती समितीसह अन्य दोन संघटनांनी आंदोलनाच्या नोटीस दिल्या असून, त्यातील पहिले आंदोलन सोमवारी (ता. १३) सुरू होणार आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. लवकरच शाळांना सुट्टी सुरू होणार असून, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून यातून काही मार्ग निघणे गरजेचे आहे.
अलीकडे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले, ‘या मुद्द्यावर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ बैठकीतच घेतला जाईल.’ तथापि, काही संघटनांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे थेट धाव घेतली आणि आपल्या संघटनेच्या नावाने स्वतंत्र बैठक बोलावल्याचे पत्र प्रसिद्ध केले. मात्र ही बैठक तातडीने रद्द करण्यात आली आणि त्यानंतरच्या घडामोडींनी संपूर्ण एसटी कर्मचारी संघटनांमध्ये खळबळ उडाली आहे.
या गोपीचंद पडळकर यांच्या सेवाशक्ती संघर्ष संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यापासून या साऱ्याची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या पुढाकाराने कृती समिती स्थापन करण्यात आली आणि पडळकर यांच्या आंदोलनाच्या तारखेआधीच त्यांनी स्वतःची आंदोलनाची नोटीस जाहीर केली. यानंतर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनेने पुन्हा एक पाऊल पुढे टाकत कृती समितीच्या नोटिसीला प्रत्युत्तर म्हणून ६ ऑक्टोबरच्या रात्री मशाल मोर्चा व ठिय्या आंदोलन केले.
...
परिवहनमंत्र्यांचा पुढाकार
या सर्व गोंधळात शेवटी पुन्हा एकदा समन्वय आणि शिस्त आणण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे, ‘सर्व संघटनांचे ऐक्य महत्त्वाचे आहे, संघर्ष नव्हे.’ त्यांच्या पुढाकारामुळे अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व एसटी कर्मचारी संघटनांची संयुक्त बैठक सोमवारी १३ आक्टोबर रोजी दुपारी १ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.