घरांच्या विक्रीत महामुंबई अव्वल
घरांच्या विक्रीत महामुंबई अव्वल
तिसऱ्या तिमाहीत २४,७०६ची विक्री; पुणे, बंगळुरू, हैदराबाद पिछाडीवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईसह एमएमआर क्षेत्रात सप्टेंबर तिमाहीत स्थावर मालमत्ता क्षेत्राला दिलासादायी ठरला आहे. जुलै-सप्टेंबर या तिसऱ्या तिमाहीत या तब्बल २४ हजार ७०६ घरांची विक्री झाली आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत दोन टक्के वाढ झाली असून, घरविक्रीत मुंबईने नंबर वन कायम राखला आहे. पुणे, बंगळूर या शहरांत या कालावधीत घरविक्री घटली आहे.
मुंबईत सेवा क्षेत्रातील वाढीमुळे माेठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण होत आहेत. येथे येणारा प्रत्येक जण घराचे स्वप्न पाहताे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील घरांच्या विक्रीचा चढता आलेख कायम असल्याचे नाइट फ्रॅंक इंडियाच्या अहवालातून झाले आहे. एप्रिल-जून या तिमाहीत सुमारे २२ हजार १०५ घरांची विक्री झाली होती. त्यात नुकत्याच संपलेल्या तिमाहीत दाेन टक्के वाढ झाली आहे. मुंबई शहराने सर्व बाजारपेठांच्या तुलनेत रहिवासी घरांच्या विक्रीत वाढ नोंदवलेली असतानाच ऑफिस मार्केटमध्ये सरासरी व्यावहारिक भाड्यातही दाेन अंकी वाढ नाेंदवली आहे.
प्रमुख शहरातील घरांची विक्री
शहर : विक्री : वाढ/घट
मुंबई : २४,७०६ : +२ टक्के
बंगळूर : १४,५३८ : - २ टक्के
दिल्ली एनसीआर : १२,९९५ : - ५ टक्के
पुणे : १२११८ : - ८ टक्के
हैदराबाद : ९६०१ : + ५ टक्के
अहमदाबाद : ४६९४ : + ३ टक्के
चेन्नई : ४६१७ : +१२ टक्के
कोलकाता : ४३७४ : + २ टक्के
----
किमतीतील वाढ
दिल्ली एनसीआर : १९ टक्के
बंगळूर : १५ टक्के
चेन्नई : ९ टक्के
कोलकाता : ८ टक्के
मुंबई : ७ टक्के
पुणे : ५ टक्के
अहमदाबाद : २ टक्के
----
नवीन घरांबाबत सावध भूमिका
मुंबईत घराची विक्री वाढत असली तरी मागील तिमाहीचा विचार करता नवीन घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याबाबत विकसकांनी सावध भूमिका घेतली आहे. जुलै-सप्टेंबर या कालावधीत केवळ १९ हजार १४५ घरे उपलब्ध केली आहेत. गतवर्षीपेक्षा ती १९ टक्क्यांनी कमी आहेत. बंगळूर, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये तुलनेने जास्त घरे उपलब्ध केल्याचे नाइट फ्रॅंक इंडियाने स्पष्ट केले आहे.
कार्यालयीन भाड्यात वाढ
मुंबईत कार्यालये भाडेतत्त्वावर घेण्याचा बाजार तेजीत असून, आतापर्यंतच्या तिन्ही तिमाहीचा विचार करता भाड्यात सुमारे ११ टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. हे शहराच्या प्रमुख व्यवसाय जिल्ह्यांत प्रीमियम ग्रेडच्या जागांना चांगली मागणी असल्याचे दिसते.
काेट
मुंबईतील घरांच्या बाजारपेठेला येथील निवासी लोकांकडून आधार दिला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडून घरांची मागणी जास्त नोंदली जात असल्यानेच मुंबईच्या स्थावर मालमत्ता क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
- गुलाम जिया, वरिष्ठ कार्यकारी संचालक, नाइट फ्रँक इंडिया
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.