रेड रन मॅरेथॉनला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रेड रन मॅरेथॉनला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Published on

रेड रन मॅरेथॉनला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेतर्फे रविवारी (ता. १२) आयोजित करण्यात आलेल्या ‘रेड रन मॅरेथॉन २०२५’ स्पर्धेला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘रन टू एण्ड एड्स’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचा उद्देश एचआयव्ही, एड्सबाबत समाजात जागरूकता निर्माण करून या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचा आहे. उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) व प्रकल्प संचालक शरद उघडे यांच्या हस्ते या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

रेड रन मॅरेथॉन या जनजागृती उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन युवकांसाठी चार किलोमीटर आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दोन किलोमीटरची मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत ५५० हून अधिक तरुण आणि २०० हून ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले, तर मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मॅरेथॉन मार्गावर कार्यरत होते. महिला गटात आर. जे. महाविद्यालय, घाटकोपर येथील रिंकी सिंग हिने प्रथम, तर सोमय्या महाविद्यालय, विद्याविहार येथील कौशल्या परमार हिने द्वितीय क्रमांक पटकावला. पुरुष गटात सेंट जी. जी. महाविद्यालयाचे सुनील सहानी याने प्रथम, तर शैलेंद्र महाविद्यालय, दहिसर येथील विशाल यादव याने द्वितीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना ऑक्टोबरमध्ये दिमापूर, नागालँड येथे होणाऱ्या राष्ट्रीय रेड रन मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. विजयकुमार करंजकर तसेच मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

...
माहिती आणि जागरूकता हीच खरी शक्ती
रेड रन मॅरेथॉन वेळी उपआयुक्त शरद उघडे यांनी सांगितले की, ‘एचआयव्ही, एड्सशी लढण्यासाठी योग्य माहिती आणि जागरूकता हीच खरी शक्ती आहे. तरुणाईने आरोग्यदूत म्हणून पुढाकार घेऊन आपल्या परिसरात आणि महाविद्यालयांमध्ये या आजाराबाबत जागरूकता पसरवावी. आपण सर्वजण मिळून गैरसमज दूर करून आणि भेदभाव मिटवून सुदृढ समाज निर्माण करू शकतो.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com