राणीबागेतील डायनासोर मॉडेल, मिनी इलेक्ट्रिक बस धुळखात!

राणीबागेतील डायनासोर मॉडेल, मिनी इलेक्ट्रिक बस धुळखात!

Published on

राणीबागेतील डायनासोर मॉडेल, मिनी इलेक्ट्रिक बस धूळखात!
वर्षभरापासून आकर्षण ठरवण्यासाठी आणलेल्या वस्तू वापराशिवाय पडून
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीबाग) हे मुंबईतील बच्चेकंपनीचे आवडते ठिकाण. मुलांना अजून आकर्षित करण्यासाठी उद्यान प्रशासनाने गेल्या वर्षभरात डायनासोरचे मॉडेल आणि मिनी इलेक्ट्रिक बस आणल्या होत्या. मात्र या दोन्ही वस्तू सध्या जागच्या जागी धूळखात पडून आहेत.
सुमारे वर्षभरापूर्वी उद्यान विभागाने मिनी डबल डेकर इलेक्ट्रिक बस आणि चार अतिरिक्त सहा आसनी फेरी वाहने विकत घेतली होती. यावर सुमारे ५५ ते ६० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. यातील सहा आसनी वाहने पर्यटकांसाठी आणली असली, तरी त्यांचा वापर सध्या फक्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठीच होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी, पर्यटकांना अजूनही या नव्या सुविधेचा लाभ घेता आलेला नाही.
यासंदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की वाहनं दाखल झाली असली तरी त्यासाठी आवश्यक कर्मचारीवर्गाची नेमणूक बाकी आहे. तसेच तिकीटदर निश्चित करणे व धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहनं अद्याप सुरू करता आलेली नाहीत.

डायनासोर झाला ‘भयानक आकर्षण’
मुलांसाठी आणलेले डायनासोर मॉडेलही सध्या अडगळीत पडून आहे. उद्यान प्रशासनाने हे आकर्षक डायनासोर मॉडेल भेट स्वरूपात घेतले होते. मात्र त्याच्या हालचाली आणि आक्राळविक्राळ आवाजामुळे अनेक लहान मुले घाबरली आणि दूर पळाली. काही मुले तर काचेच्या दरवाजावर आदळली, अशा घटना घडल्या. त्यामुळे डायनासोर मॉडेलला प्रवेशद्वारातून काढून अडगळीत ठेवण्यात आले. आता त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने ते वापरायोग्य राहिलेले नाही.

मुलांना आकर्षित करण्यासाठी डायनासोर आणला होता; पण त्याला मुलं घाबरत असल्याने तो हटवावा लागला. बंद अवस्थेत पुन्हा ठेवता येईल का याचा विचार सुरू आहे. तर ई-वाहन सेवेसाठी कर्मचारी नेमणे आणि तिकीटदर निश्चित करणे सुरू असून, त्यानंतर ही वाहने सुरू केली जातील.
- डॉ. संजय त्रिपाठी, संचालक, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com