एसटीचा ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ स्वस्त

एसटीचा ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ स्वस्त

Published on

एसटीचा ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ स्वस्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : एसटी महामंडळाने ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ या योजनेच्या तिकीटदरामध्ये कपात केल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ या योजनेअंतर्गत चार दिवस तसेच सात दिवसांच्या पासचे दर वाढविले होते; मात्र प्रवाशांची मागणी लक्षात घेता या योजनेचे दर कमी करण्यात आले असून, महामंडळाने नवीन दरपत्रक जाहीर केले आहे.

एसटी महामंडळाने २४ जानेवारीपासून विविध बससेवांच्या प्रतिटप्पा दरात वाढ केली होती. नवीन टप्पा दरपत्रकाप्रमाणे ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ या योजनेअंतर्गत दर १ फेब्रुवारी २०२५ पासून सुधारित करण्यात आले होते. या दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी होती. प्रवाशांनी पासचे दर कमी करण्याबाबत मागणी केली होती. या मागणीची गंभीर दखल घेऊन महामंडळाने मंगळवारी (ता. ७) मध्यरात्रीपासून दर कमी केले आहे. एसटीने आवडेल तेथे प्रवास योजनेच्या पासचे दर एकूण रकमेच्या २५ टक्क्यांपेक्षा कमी केले आहेत. त्यामुळे एसटीने प्रवास करणे आता आणखी स्वस्त झाले आहे.


‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ या योजनेअंतर्गत दरपत्रक
साधी बससेवा
प्रकार - नवे दर - जुने दर
चार दिवस (प्रौढ) १,३६४ - १,८१४
चार दिवस (मुले) ६८५- ९१०
सात दिवस (प्रौढ)२,३८२ ३,१७१
सात दिवस (मुले) १,१९४ - १,५८८
===
शिवशाही बससेवा (आंतरराज्यासह)
प्रकार - नवे दर - जुने दर
चार दिवस (प्रौढ) १,८१८ -२,५३३
चार दिवस (मुले) ९११ - १,२६१
सात दिवस (प्रौढ) ३,१७५ ४,४२९
सात दिवस (मुले) १,५९० - २,२१७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com