‘महाबोधी’साठी दिल्लीत आंदोलन

‘महाबोधी’साठी दिल्लीत आंदोलन

Published on

‘महाबोधी’साठी दिल्लीत आंदोलन
महाविहारमुक्तीसाठी आझाद मैदानात सर्वपक्षीय मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.१४ : बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (ता. १४) आझाद मैदानावर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाबोधी महाविहार आंदोलन कृती समितीच्या पुढाकाराने हे आंदोलन झाले. या मोर्चात विविध आंबेडकरी विचारांचे पक्ष, संघटना आणि भिक्खू संघ एकत्र आले होते. या वेळी आठवले म्हणाले, ‘बोधगया महाविहार समिती फक्त बौद्धांची असावी आणि बिहारचा बी.टी.एम.सी. कायदा (१९४९) रद्द करावा, हे आंदोलन समाजाच्या न्यायहक्कासाठी आहे.’ या वेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की ‘बिहार सरकार डोळेझाक करत आहे. बी.टी.एम.सी. कायदा रद्द करा आणि विहार बौद्ध समाजाला द्या. जोपर्यंत हे मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरू राहील.’ प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी हा अस्तित्वाचा लढा असल्याचे सांगत दिल्लीमध्ये धडक आंदोलन करण्याचा इशारा दिला. खासदार चंद्रकांत हंडोरे म्हणाले की, ‘ही केवळ सुरुवात आहे. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील.’ असे सांगितले. या आंदोलनात प्रा. जोगेंद्र कवाडे, खासदार वर्षा गायकवाड, खासदार चंद्रकांत हंडोरे, सुलेखा कुंभारे, राजकुमार बडोले, डॉ. राजेंद्र गवई, डॉ. सुरेश माने, भाई गिरकर, राजू वाघमारे, अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर, गायक आनंद शिंदे आदी उपस्थित होते.

हा आमच्या अस्मितेचा प्रश्न!
भाजप नेते भाई गिरकर यांनी ‘बौद्धांवर अन्याय करणारा हा कायदा रद्द करा’ अशी मागणी केली. माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी ‘महाबोधी महाविहार हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे,’ असे सांगितले. आमदार संतोष बांगर म्हणाले, ‘हा अन्यायकारक कायदा रद्द करा, नाहीतर महाविहार बौद्धांच्या ताब्यात जबरदस्तीने घेऊ,’ असा इशारा त्यांनी दिला. भंते राहुल बोधी आणि आकाश लामा यांनी बौद्धांच्या हक्कासाठी सतत लढत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.


आंबेडकर कुटुंबीयांची पाठ
आझाद मैदानातील आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले असले तरी या आंदोलनाकडे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र पाठ फिरवली. इतकेच नाही तर रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर आणि बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर हेदेखील अनुपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com