‘देवनार’चे कचऱ्याचे डोंगर हटणार
‘देवनार’चे कचऱ्याचे डोंगर हटणार
११० हेक्टर जमीन घेणार माेकळा श्वास; ३,०३५ कोटींचे कंत्राट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबईतील सर्वात मोठ्या आणि प्रदूषण निर्माण करणाऱ्या देवनार कचराभूमीवरील कचऱ्याचे डाेंगर सफाईला अखेर गती मिळाली आहे. महापालिकेने या ठिकाणी साचलेल्या तब्बल १८५ लाख टन कचऱ्याच्या उत्खनन, प्रक्रिया आणि जमीन पुनर्प्राप्तीच्या कामासाठी मे. नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडला तीन हजार ०३५ काेटी ५४ लाख रुपयांचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची धूर, दुर्गंधीपासून मुक्तता हाेणार आहे.
देवनार कचराभूमीवर १९२७ पासून कचरा टाकला जात आहे. येथे आठ ते ४० मीटर उंचीपर्यंत कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. येथील कचरा पर्यावरणाबराेबरच नागरिकांच्या आरोग्यासाठीही मोठा धोका बनला होता. या कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने उत्खनन करून त्यावर बायोरिमेडिएशन (जैवउपचार) तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रक्रियेनंतर सुमारे ११० हेक्टर जमीन पुनर्प्राप्त होणार असून, ती सार्वजनिक प्रकल्पांसाठी वापरता येणार आहे. महापालिकेने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद केली आहे, तर उर्वरित निधी २०२६-२७ मध्ये वितरित केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहर बनविण्याच्या दिशेने हा ऐतिहासिक टप्पा असून, देवनार, मुलुंड आणि इतर कचराभूमींवरील जुन्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून पर्यावरणपूरक पुनर्वसनाचे उद्दिष्ट साध्य करणे हे या योजनेमागचे प्रमुख ध्येय असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
----
प्रतिटन सफाईसाठी १,३१९ रुपये
- या प्रकल्पासाठी महापालिकेने ई-टेंडर प्रक्रिया राबवली होती. यात नवयुगा इंजिनिअरिंग, एच. जी. इन्फ्रा इंजिनिअरिंग आणि री सस्टेनेबिलिटी या तीन नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
- तांत्रिक आणि आर्थिक दोन्ही तपासणीनंतर नवयुगा इंजिनिअरिंग यांना हे कंत्राट देण्यात आले. कंपनीने २,४४०.१५ कोटी रुपये (१३१९ रुपये प्रति टन) दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
- हा दर अंदाजपत्रकापेक्षा केवळ ३.०२ टक्के जास्त आहे. तीन वर्षे कालावधीत (पावसाळ्यासह) हे काम करणे अपेक्षित आहे.
--------
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.