मेनिफिस्ट ज्वेलरी कलेक्शनचे ‘तनिष्क’तर्फे अनावरण

मेनिफिस्ट ज्वेलरी कलेक्शनचे ‘तनिष्क’तर्फे अनावरण

Published on

मेनिफिस्ट ज्वेलरी कलेक्शनचे ‘तनिष्क’तर्फे अनावरण

मुंबई, ता. १५ : तनिष्क ज्वेलरीच्या मिया ब्रँडच्या मेनिफिस्ट या खास सणासुदीसाठी आणलेल्या ज्वेलरी कलेक्शनचे अनावरण येथे लोकप्रिय अभिनेत्री आणि तनिष्काची ब्रँड ॲम्बेसेडर अनीत पड्डा हिच्या हस्ते करण्यात आले.
हे आधुनिक, नव्या डिझाइनचे दागिने आजच्या जमान्यातील तरुण महिलांसाठी आहेत. हलक्या वजनाचे आकर्षक दागिने केव्हाही वापरता येतील अशा डिझाइनचे असून, नव्या ट्रेंडचे हे दागिने महिलांना नक्की पसंत पडतील, असे तनिष्काच्या ज्वेलरी डिव्हिजनचे सीईओ अजोय चावला या वेळी म्हणाले. आम्ही आमच्या सोन्याच्या व्यवहारात ग्राहकांना अतीव पारदर्शकता देतो. देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी ग्राहकांनी नवे दागिने न करता आपल्याकडील सोने आम्हाला देऊन त्याऐवजी नवीन दागिने करावेत, असेही चावला यांनी ‘सकाळ’ला सांगितले. जुने दागिने मोडून नवे दागिने देण्याचा व्यवहार आम्ही अत्यंत पारदर्शकपणे करतो. कारण लोक विश्वासानेच सोने घेतात. आमचा व्यवहार ग्राहककेंद्री आहे. ग्राहकाला आम्ही गुणवत्ता, नवे डिझाइन, आधुनिक काळातील ताजे डिझाइन, पारदर्शकता हे सर्व देतो, असेही ते म्हणाले. या क्षेत्रात सध्या भरपूर स्पर्धा असली तरी आम्ही आमच्या पद्धतीने नवनवे बाजार काबीज करीत आहोत. सध्या आमची एकूण २७५ स्टोअर असून, वर्षअखेर त्यांची संख्या ३०० होईल. दोन ते तीन वर्षांत देशभरात आमची ५०० दुकाने २०० शहरांत असतील, असेही ते म्हणाले.
...
तरुण महिला आमच्या ग्राहक!
आमच्या इतर स्थानिक स्पर्धकांच्या दागिन्यांची डिझाइन परंपरागत आहेत, तर आमची डिझाइन आधुनिक प्रकारची, हलक्या दागिन्यांची आहेत. ज्यांना वेगळे काहीतरी हवे आहे अशा तरुण महिलांसाठी आमची वेगळी डिझाइन आहेत. याच तरुण महिला आमच्या ग्राहक असून, आमच्या स्पर्धकांचे ग्राहक वेगळे आहेत, असेही चावला म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com