नांदेड ‘वंदे भारत’ला सहा तास विलंब

नांदेड ‘वंदे भारत’ला सहा तास विलंब

Published on

नांदेड ‘वंदे भारत’ला सहा तास विलंब

रेल्वेच्या दिरंगाईमुळे नियाेजनाचा फज्जा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबई-नांदेड वंदे भारत एक्स्प्रेसचे (ट्रेन क्र. २०७०६) रविवारी अचानक वेळापत्रक काेलमडले. नियाेजित वेळेपेक्षा सहा तास उशिराने ही गाडी सुटल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. केटरिंग शुल्क आगाऊ भरूनही अनेकांचे अन्न-पाण्याविना हाल झाले. रेल्वेच्या ढिसाळ नियाेजनामुळे दिवाळी सणासाठी गावी निघालेल्या प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले. यामुळे त्यांनी रेल्वे प्रशासनाला लाखाेली वाहिली.

मुंबई-नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी १:१० वाजता सीएसएमटीहून निघते; मात्र रविवारी ही गाडी संध्याकाळी ७.३० वाजता सुटली. या विलंबाची कल्पना सकाळी १०.३०च्या सुमारास रेल्वे प्रशासनाने दिली असली तरी दिवाळी साजरी करण्यासाठी गावी निघालेल्या प्रवाशांच्या नियाेजनाचा फज्जा उडाला. कुटुंबकबिल्यासह गावी निघालेल्यांचे प्रचंड हाल झाले. विशेषत: वृद्ध आणि मुलांसाठी हा अनुभव खूपच त्रासदायक हाेता. रेल्वे स्थानकावर खाण्या-पिण्याचे खूपच हाल झाले. प्रवाशांना तासन्‌तास थांबावे लागले. याबाबत सीएसएमटी स्टेशन मास्टरकडे तक्रारही करण्यात आली. गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांसाठी अन्न व लाउंजची सुविधा उपलब्ध करावी, आधीच भरलेले ऑनबोर्ड केटरिंग शुल्क परत करावे, मानसिक व शारीरिक त्रासासाठी तिकीटदराच्या तीन पट नुकसानभरपाई द्यावी तसेच रेल्वेने लिखित माफी देऊन भविष्यात विलंबाच्या वेळी प्रवाशांशी संवाद साधावा, अशी मागणी प्रदीप पाटील या प्रवाशाने स्टेशन मास्टरकडे केली.
-----
प्रवाशांना आर्थिक भुर्दंड
रविवारी मेगाब्लॉक असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रवासी दोन तास आधीच सीएसएमटी स्थानकात पाेहाेचले हाेते. नि:शुल्क प्रतीक्षालयातही जागा नव्हती. त्यामुळे ही सशुल्क सुविधा घ्यावी लागल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला, असा अनुभव अनेक प्रवाशांनी सांगितला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com