१९ कोटींची हस्तगत मालमत्ता पोलिसांकडून परत

१९ कोटींची हस्तगत मालमत्ता पोलिसांकडून परत

Published on

१९ कोटींची हस्तगत मालमत्ता पोलिसांकडून परत
दिवाळीपूर्वी अनपेक्षित भेटीने चार हजार नागरिक सुखावले
मुंबई, ता. २० : मुंबई पोलिसांनी मालमत्ता चोरीच्या गुन्ह्यांची उकल करून हस्तगत, जप्त केलेली तब्बल १९ कोटींची मालमत्ता चार हजारांहून अधिक नागरिकांना परत केली. दिवाळीपूर्वी पोलिसांनी दिलेल्या या अनपेक्षित भेटीने नागरिक सुखावले.
मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी शहरातील पोलिस ठाण्यांना मोबाईल चोरी, घरफोड्या, सोनसाखळी चोरी, वाहनचोरी, रस्त्यात पायी जाणाऱ्या वृद्धांची बोलबच्चन टोळीकडून चालता बोलता होणारी लूट आदी गुन्ह्यांचा जलद तपास करण्याच्या, चोरी झालेल्यांपैकी १०० टक्के मालमत्ता हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासोबत असे गुन्हे घडणार नाहीत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेशही दिले होते. हस्तगत मालमत्ता नागरिकांना दिवाळीपूर्वी परत करावी, यासाठी भारती विशेष आग्रही होते. त्यानुसार शहरातील पाच प्रादेशिक विभागांमधील १३ उपायुक्तांनी गेल्या दोन आठवड्यांत हस्तगत मालमत्ता नागरिकांना परत करता याव्यात, या उद्देशाने कार्यक्रम आयोजित केले. त्यात एकूण ४,१६९ नागरिकांना त्यांची मालमत्ता परत करण्यात आली.
पोलिसांनी हस्तगत केलेल्या मालमत्तांत मोबाईलची संख्या सर्वाधिक होती. त्याखालोखाल दुचाकींपासून आलिशान कारपर्यंतची वाहने, सोने-चांदीचे दागिने, लॅपटॉप, कॅमेरा, रोख रकमेचा समावेश होता.

८,९९४ मालमत्ता चोरीचे गुन्हे
यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात सध्या चोरी, जबरी चोरी (रॉबरी), दरोडा, घरफोड्या, वाहनचोरी, सोनसाखळी चोरी इत्यादी ८९९४ मालमत्ता चोरीचे गुन्हे शहरात नोंद झाले आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत नोंद गुन्ह्यांची संख्या १०,३९१ इतकी होती. त्या तुलनेत या वर्षी मालमत्ता चोरीचे १,३९७ गुन्हे कमी घडले आहेत.

सोनसाखळी चोरी आजही गंभीरच
दुचाकीवर येऊन रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चेन असे दागिने हिसकावून पळ काढणाऱ्यांना पुरता चाप लावण्यात मुंबई पोलिसांना यश आले. मात्र आजही हा गुन्हे प्रकार पोलिसांच्या दृष्टीने गंभीर मानला जातो व तो घडू नये, यासाठी उपाययोजना केल्या जातात. सोन्याचा वाढता भाव लक्षात घेता हा किंवा अन्य कोणताही दागिना पुन्हा घडवून घेणे अनेकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. या गुन्हे पद्धतीत अनेक महिला गंभीर जखमीही झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com