सेन्सेक्स ४११ अंश वाढला
सेन्सेक्स ४११ अंश वाढला
मुंबई, ता. २० : रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिन्सर्व्ह, ॲक्सिस बँक, स्टेट बँक, एअरटेल आदी बड्या शेअरमध्ये आज जोरदार खरेदी झाली. त्यामुळे आज भारतीय शेअर बाजार निर्देशांक अर्धा टक्का वाढले. सेन्सेक्स ४११.१८ अंश, तर निफ्टी १३३.३० अंश वाढला.
दिवाळीच्या मुहूर्तावर आज सकाळपासून बाजारात तेजीचे वातावरण होते. सेन्सेक्सची सुरुवातच ८४ हजारांच्या वर झाली आणि दिवसभर तोच चौऱ्याऐंशी हजारांच्या पातळीत होता. दिवसअखेर सेन्सेक्स ८४,३६३.३७ अंशावर, तर निफ्टी २५,८४३.१५ अंशावर स्थिरावला.
सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर साडेतीन टक्के वाढून १,४६६ रुपयांवर गेला. बजाज फिन्सर्व्ह, ॲक्सिस बँक, स्टेट बँक, भारती एअरटेल हे शेअर दोन ते पावणे तीन टक्के वाढले. टीसीएस, टायटन, इन्फोसिस, बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर, सन फार्मा या शेअरचे भावही एक ते पावणेदोन टक्का वाढले. दुसरीकडे आयसीआयसीआय बँक तीन टक्के घसरला. महिंद्र आणि महिंद्र, एटरनल हे शेअरही एक टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. अदाणी पोर्ट, पॉवरग्रीड, हिंदुस्तान युनिलिव्हर या शेअर्सचे भावही घसरले. दिलेली कर्जे कमी झाल्यामुळे आयसीआयसीआय बँकेचा शेअर घसरला, तर निकाल चांगले आल्यामुळे एचडीएफसी बँकेचा शेअर वाढला.
......
इतके दिवस घरगुती देशांतर्गत आर्थिक स्थिती चांगली असूनही जागतिक अवस्थेमुळे आपण मागे पडलो होतो, मात्र आता कंपन्यांचे निकाल चांगले लागून शेअरचे भावही वाढतील अशी अपेक्षा आहे.
अमीष व्होरा, अध्यक्ष प्रभुदास लीलाधर कॅपिटल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.