पूर्व उपनगरातील जलवाहिन्यांसाठी ५.१७ कोटींचा प्रकल्प
पूर्व उपनगरातील जलवाहिन्यांसाठी ५.१७ कोटींचा प्रकल्प
१२ महिन्यांत काम पूर्ण करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : पूर्व उपनगर विभागातील वारंवार होणाऱ्या जलगळतीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून महापालिकेने मोठी पावले उचलली आहेत. या भागातील ३०० मिमी आणि त्यावरील आकारमानाच्या जलवाहिन्यांच्या गळती दुरुस्तीसाठी पाच कोटी १७ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. हे काम सुमती सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे सोपविण्यात आले असून, १२ महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण होणार आहे.
महापालिकेच्या जलपुरवठा विभागाकडे दररोज जलगळती, पाईपलाईन फुटणे, पाण्याच्या अपव्ययाबाबत तक्रारी येतात. पाइपलाइन बहुतांश ठिकाणी रस्त्यांच्या खाली असल्याने, वीज, गॅस, टेलिफोन आणि फायबर ऑप्टिक केबल्ससारख्या इतर सुविधांच्या उपस्थितीमुळे ही कामे अत्यंत गुंतागुंतीची आणि वेळखाऊ ठरतात. त्यामुळे या दुरुस्ती कामासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि आधुनिक उपकरणांचा वापर केला जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कामासाठी चार कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यापैकी सुमती सोल्युशन्स प्रा. लि. या कंपनीने २७ टक्के दरकपात देऊन सर्वात कमी बोली लावली आणि ती निवडण्यात आली. मूळ अंदाज ४.७३ कोटी रुपये होता; मात्र दरकपात, वस्तू व सेवा कर आणि इतर खर्चांसह एकूण खर्च ५.१७ कोटी रुपये ठरविण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत जलवाहिन्यांची गळती दुरुस्ती, नवीन चेंबर बांधकाम, झडपांचे पुनर्स्थापन, चेंबर कव्हरचे नूतनीकरण, तसेच जुन्या लाइन्सची चाचणी आणि दाब नियंत्रण प्रणालीची तपासणी केली जाणार आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होऊन पुरवठ्याचा दाब व गुणवत्ता सुधारेल, असा महापालिकेचा दावा आहे.
पाणीपुरवठा होणार सुरळीत
कामासाठी लागणारा निधी महापालिकेच्या २०२५-२६ च्या भांडवली अर्थसंकल्पातून दिला जाणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्व उपनगरातील कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर आणि गोवंडी परिसरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत आणि कार्यक्षम होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.