चोर समजून तरुणाची हत्या

चोर समजून तरुणाची हत्या

Published on

चोर समजून तरुणाची हत्या
गोरेगाव येथील निर्माणाधीन इमारतीतील घटना

मुंबई, ता. २१ ः गोरेगाव येथील निर्माणाधीन इमारतीतील चार मजुरांनी एका तरुणाला अमानुष मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना रविवारी (ता. १९) पहाटे तीन वाजता डोंगरी भागातील राज पॅथ्रॉन या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घडली. यामध्‍ये मृत तरुणाचे नाव हर्षल परमा (वय २६) असे आहे.
इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पहाटे तीनच्या सुमारास मजूर वसंत प्रसाद हा खाली आला आणि त्याने इमारतीत चार चोर शिरल्याचे सांगत चोरांनी कामगारांचे मोबाईल चोरले आहेत. त्यातील तिघे पळून गेले तर एकाला पकडल्याचे सांगितले. सुरक्षा रक्षकाने तिसरा मजला गाठेपर्यंत काही कामगारांनी हर्षलचे हात-पाय बांधून त्याला बांबू, लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली होती. सुरक्षा रक्षकाने हर्षलला सोडा, मारू नका, पोलिसांच्या हवाली करा, अशी विनंती या मजुरांकडे केली; मात्र या मजुरांनी त्यालाच धमकावून तेथून जाण्यास सांगितले. पुढे सकाळी सातच्या सुमारास हर्षल तळमजल्यावर गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे सुरक्षा रक्षकाला आढळले. हर्षलला मारहाण करणाऱ्या सलमान खान, इसमुल्ला खान, गौतम चमार आणि राजीव गुप्ता या चार मजुरांविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com