रोजंदारी कामगारांची दिवाळी अंधारात!
रोजंदारी कामगारांची दिवाळी अंधारात!
आरोग्य विभागाकडून बोनसचा प्रस्ताव रखडला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : महापालिकेचे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना यावर्षीच्या दिवाळीसाठी तब्बल ३१ हजारांचे सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी १६ ऑक्टोबर रोजी बोनस जाहीर केला आणि दुसऱ्याच दिवशी १७ ऑक्टोबर रोजी कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. यामुळे कायम कर्मचाऱ्यांची दिवाळी उजळली; मात्र त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे सुमारे १,२०० रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगार अद्याप बोनसपासून वंचित आहेत.
महापालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेले हे रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगार अनेक वर्षांपासून कायम कर्मचाऱ्यांइतकेच काम करतात. आरोग्य विभागाकडून या कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनससाठीचा प्रस्ताव महापालिका उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांनी १६ ऑक्टोबर रोजीच सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र अद्याप प्रस्ताव सादरच झालेला नाही. मागील वर्षीदेखील बोनसचा प्रस्ताव मार्चमध्ये दाखल करण्यात आला होता, तोही केवळ ५,००० इतक्या ठोक रकमेचा होता, मात्र तोप्रस्ताव महापालिका आयुक्तांनी विचारल्यानंतर थेट थंड बस्त्यात गेला. त्यामुळे हे कर्मचारी गेल्या वर्षी ही बोनसपासून वंचित राहिले. या पार्श्वभूमीवर म्युनिसिपल मजदूर युनियनच्या प्रतिनिधींनी महापालिका आयुक्त डॉ. गगराणी यांची भेट घेऊन मागील वर्षाचा आणि चालू वर्षाचा बोनस एकत्र देण्याची मागणी केली. यामध्ये वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रूग्णालयाचे प्रभारी संचालक डॉ. मोहन जोशी
यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु प्रस्ताव अद्याप सादर न झाल्याने कामगार नाराज आहेत.
आंदोलनाचा इशारा
कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांची २० ऑक्टोबर रोजी भेट घेऊन प्रस्ताव सादर करण्याची विनंतीही केली, मात्र या अन्यायामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष निर्माण झाला असून, म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी या विषयावर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.