फलटणप्रकरणी ‘मार्ड’ची अंबादास दानवेंशी चर्चा
फलटणप्रकरणी ‘मार्ड’ची
अंबादास दानवेंशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : फलटण येथील डॉक्टर महिलेच्या झालेल्या मृत्यू प्रकरणावर न्याय मिळावा आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात ठोस पावले उचलावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी पदाधिकाऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाईबराेबरच आरोग्य क्षेत्रातील सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली.
डाॅक्टर महिलेला न्याय मिळावा यासाठी संघटनेने जाहीर केलेल्या आंदोलनांची रूपरेषाही दानवे यांना सादर केली. दानवे यांनी मार्डच्या सर्व मागण्यांना पाठिंबा दर्शवून हे प्रकरण योग्य मंचांवर ठामपणे मांडण्याचे आणि वैद्यकीय क्षेत्रातील समस्यांबाबत सरकारकडून ठोस भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. मार्डने सांगितले, की आमचे प्रयत्न केवळ या घटनेत न्याय मिळवण्यापुरते मर्यादित नसून, राज्यभरातील सर्व आरोग्य व्यावसायिकांना सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यपरिस्थिती मिळावी यासाठी आहेत. संघटनेने पुढेही डॉक्टरांच्या हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी सातत्याने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
---
नागपुरात मेणबत्ती श्रद्धांजली
नागपूर संविधान चौक, आरबीआय चौकाजवळ डॉक्टर महिलेच्या स्मरणार्थ मेणबत्ती श्रद्धांजली कार्यक्रम भावनिक वातावरणात पार पडला. मोठ्या संख्येने डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग घेत श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर संघटनेचे डॉ. समीर गोलावार, सेंटर मार्ड सचिव डॉ. सुयश धावणे, एमएजीएमओ संघटनेचे डॉ. राहुल कन्नमवार व आयएमए संघटनेचे डॉ. राजेश सावरबांधे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

