तब्बल तेरा वर्षांनी आरोपीची सुटका

तब्बल तेरा वर्षांनी आरोपीची सुटका

Published on

तब्बल १३ वर्षांनी आरोपीची सुटका
मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोटप्रकरणी जामीन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईत १३ जुलै २०११ रोजी झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. ४) जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आरोपीची तब्बल १३ वर्षांनी सुटका होणार आहे. न्या. अजय गडकरी आणि न्या. आर. आर. भोसले यांच्या खंडपीठाने काफील अहमद मोहम्मद अयूब (वय ६५) याला एक लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला.

मुंबईतील गजबजलेल्या झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर कबुतरखाना परिसरातील एका शाळेजवळ १३ जुलै २०११ रोजी एकाच वेळी झालेल्या तीन बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली होती. याप्रकरणी मूळचा बिहारचा रहिवासी असलेल्या अयूबला फेब्रुवारी २०१२मध्ये अटक करण्यात आली. तेव्हापासून तो मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने हे स्फोट घडवून आणले होते आणि संघटनेचा संस्थापक यासीन भटकळ हा या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केला आहे. विशेष न्यायालयाने २०२२मध्ये अयूबचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्या आदेशाला अयूबने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अयूब आणि या प्रकरणातील इतर आरोपींनी इंडियन मुजाहिदीनच्या आदेशानुसार मुस्लिम तरुणांना दहशतवादी कृत्ये करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. तसेच अयूब मुख्य सूत्रधार यासीन भटकळच्या संपर्कात असल्याचाही दावा करण्यात आला.

...
प्रकरणात गोवल्याचा दावा
‘आपण निर्दोष असून, या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आले आहे. बळजबरीने घेतलेल्या जबाबाशिवाय आपल्याविरोधात सरकारी पक्षाकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत,’ असा दावा अयूबने जामिनाची मागणी करताना केला होता. त्याचप्रमाणे एक दशकाहून अधिककाळ तो कारागृहात असून, खटल्याला अजूनही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आपण जामिनास पात्र असल्याचा दावाही अयूबने केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com