अधिकाऱ्यांची मनी ट्रान्सफरद्वारे गुंतवणूक

अधिकाऱ्यांची मनी ट्रान्सफरद्वारे गुंतवणूक

Published on

अधिकाऱ्यांची मनी ट्रान्स्फरद्वारे गुंतवणूक
दोन टक्के दलाली देऊन पैसा सहाय्यक आयुक्ताकडे
सकाळ वृ्त्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्ताने सांगितलेल्या योजनेनुसार, वांद्रे येथील पुनर्विकास प्रकल्पासाठी विविध सरकारी अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काळा पैसा गुंतवला. यासाठी शहरातील मनी ट्रान्सफर आणि बोगस कंपन्यांद्वारे कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार घडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.
या प्रकरणात संशयाचा रोख असलेल्या मुंबई महालिकेच्या सहाय्यक आयुक्ताने पोलिस, पालिका अधिकाऱ्यांसह चित्रपट अभिनेता आणि अन्य व्यावसायिकांना चार ते पाच मनी ट्रान्स्फर आणि अन्य बोगस कंपन्यांच्या बँक खात्यांवर गुंतवणुकीतील काही रक्कम भरण्यास सांगितले. ही बँक खाती वांद्रे येथे पुनर्विकास करणाऱ्या विकसकाशी संबंधित असून, त्यानेच तशा सूचना दिल्याचे सहाय्यक आयुक्ताने सर्वांना पटवून दिले. त्यामुळे बहुतांश सरकारी अधिकारी, खासगी व्यक्तींनी या खात्यांवर सुमारे १५ कोटी रुपये धनादेश, आरटीजीएसद्वारे जमा केले. पुढे या मनी ट्रान्स्फर कंपन्यांना दोन टक्के दलाली देऊन सहाय्यक आयुक्ताने रोख रक्कम आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या प्रकरणातील एका चित्रपट अभिनेत्याने सुमारे तीन कोटी, तर एका व्यावसायिकाने दोन कोटी रुपये मनी ट्रान्स्फर कंपन्यांमार्फत सहाय्यक आयुक्ताला दिले. या व्यवहाराच्या एन्ट्री ‘सकाळ’च्या हाती लागल्या आहेत. त्यानुसार मनी ट्रान्स्फर कंपनीच्या मालकाशी संपर्क साधला असता, त्याने आपला व संबंधित विकसकाचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले.
---
कागदपत्रे दाखवण्यास नकार
आपल्यासह अनेकांनी कायदेशीर पद्धतीने अर्थात धनादेश, आरटीजीएसद्वारे पैसे गुंतवल्याचा दावा संबंधित सहाय्यक आयुक्ताने ‘सकाळ’कडे केला होता; मात्र अनेकदा मागणी करूनही त्याने त्याबाबतची कागदपत्रे दाखवण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर मनी ट्रान्स्फर, बोगस कंपन्यांद्वारे केलेल्या व्यवहारांनाच तो कायदेशीर म्हणत असावा, असा संशय आहे. आपण ही कागदपत्रे संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करू, अशी प्रतिक्रिया त्याने नोंदवली.
-------
पोलिस महिलेचे घरभाडे महिना दोन लाख
१. तक्रारदार निशित पटेल यांच्या अपहरणात प्रत्यक्ष सहभागाचा आरोप असलेली महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक दरमहा दोन लाख रुपये घरभाडे असलेल्या केम्प्स कॉर्नर परिसरातील उच्चभ्रू इमारतीत वास्तव्यास आहे.
२. प्रत्यक्षात हे घर पटेल यांच्या तक्रार अर्जात नमूद गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अन्य संशयित आरोपीच्या मालकीचे आहे. इतकेच नव्हे तर ती सुमारे ५० लाख किमतीची एमजी ग्लोस्टर कार वापरते.
३. अपहरणावेळी तू कुठेही तक्रार कर, आमचे कोणीच काहीही करू शकणार नाही, असा दावा या पोलिस महिलेने केल्याचा आरोप पटेल यांनी केला आहे. त्यानंतर काही गुंडांना घेऊन ती आपल्या घरी आल्याचाही दावा पटेल यांनी केला.
४. दरम्यान, याबाबत संबंधित पोलिस महिलेची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com