मुंबईला खरी मदत मुंबई बँकेमार्फतच!
मुंबईला खरी मदत मुंबई बँकेमार्फतच!
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे प्रतिपादन
मुंबई, ता. १९ : जगातील, देशातील बँकांची मुख्यालये मुंबईत आहेत; मात्र सामान्य मुंबईकराला खऱ्या अर्थाने मदत फक्त मुंबई जिल्हा सहकारी बँकेमार्फतच केली जात असल्याचे गौरवोद्गार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणे आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक व मुंबई जिल्हा सहकारी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य सहकारी संघ संलग्न विभागीय सहकारी मंडळ, जिल्हा सहकारी बोर्ड यांच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांकरिता ‘सहकारी शिक्षण-प्रशिक्षण कार्यासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना’ या विषयावर बुधवारी (ता. १९) मुंबई बँकेच्या फोर्ट येथील मुख्यालयात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नार्वेकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर होते. या वेळी नार्वेकर म्हणाले, की २०४७मध्ये भारत देश संपूर्णपणे विकसित देश म्हणून ओळखला जाईल. हे ध्येय गाठणे मुंबई बँकेसह सहकार क्षेत्रातील विविध संस्थांनी केलेल्या कार्यामुळेच शक्य होईल. येणाऱ्या काळात देशवासीयांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे असेल तर सहकार क्षेत्रावर मोठी जबाबदारी आहे. ती योग्यरीत्या तुम्ही पार पाडाल याची खात्री आहे. लोकशाहीत समान संधीचा अधिकार जनतेपर्यंत पोहोचवायचा असेल तर सहकार क्षेत्राची वाढ करणे, त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. विधानसभेचा अध्यक्ष म्हणून जेव्हा सहकारहिताचे कायदे संमत करण्याचा प्रश्न येईल तेव्हा आवर्जून योग्य कारवाई करू, असेही नार्वेकर यांनी या वेळी आश्वस्त केले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकेही या वेळी देण्यात आली. या स्पर्धेत भाग घेतलेल्या ५० विद्यार्थ्यांना राज्य सहकारी संघाचे प्रचारक म्हणून राज्यभर फिरवू या, तरच सहकाराचे आकर्षण तरुण पिढीला येईल, असा आशावादही दरेकरांनी व्यक्त केला.
शिक्षण निधी पूर्ववत करण्याची मागणी!
दरेकर म्हणाले, की महाराष्ट्र राज्य सहकारी संघ ही राज्याच्या सहकार क्षेत्राला मार्गदर्शन करणारी शिखर संस्था आहे. या संघाची धुरा माझ्या खांद्यावर दिल्यानंतर सर्व बोर्डांना बोलावून त्यांच्या समस्या ऐकून त्या सरकार दरबारी मांडव्यात, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पूर्वी या संघाला शिक्षण निधी मिळायचा तो आता बंद आहे. प्रशिक्षण देणारी सर्वात मोठी संस्था आमची आहे. त्यामुळे हा शिक्षण निधी पूर्ववत करावा, ही संस्था जगली पाहिजे व राज्याच्या शिक्षणाला, सहकाराला प्रशिक्षण दिले पाहिजे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याबाबत मदत करावी, अशी विनंतीही या वेळी दरेकर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

