“अन्यायाला वाचा फोडणारी आधुनिक पत्रकारिता; महाराष्ट्राचा खरा स्टार”
पत्रकारितेत अन्यायाला वाचा फोडण्याचे सामर्थ्य
‘स्टार महाराष्ट्र अवॉर्ड’मध्ये महाराष्ट्राचा स्टार मीच असल्याचे आठवले यांचे विधान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : ‘आधुनिक तंत्रज्ञानामुळे आजची पत्रकारिता गतिमान व प्रभावी झाली असून, अन्यायाला आवाज देण्याचे सामर्थ्य तिने राखले आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. रवींद्र नाट्य मंदिर येथे साप्ताहिक स्टार महाराष्ट्र आणि वरदविनायक बहुद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
‘दलित पँथरच्या काळात अनेक पत्रकार राहिले माझ्या पाठीशी, कारण माझा भीम होता माझ्या गाठीशी, असे सांगत माणसांना जोडण्याचे आणि अन्यायाला थांबवण्याचे काम मी केले, म्हणूनच मी महाराष्ट्राचा स्टार आहे. रामदास आठवले यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संपादक, पत्रकांरांचा ‘स्टार महाराष्ट्र अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टार महाराष्ट्रचे संपादक हेमंत रणपिसे यांनी केले.
संघर्षाच्या काळात मी सिद्धार्थ वसतिगृहात राहात होतो. तिथूनच आम्ही दलित पँथरची चळवळ चालवायचो. त्या वेळी मी स्वतः बातम्या लिहून मुंबईतील विविध वृत्तपत्रांच्या कार्यालयात जायचो. त्या वेळी माझ्या कामाची दखल पत्रकारांनी घेतली म्हणून मी राजकारणात या पदापर्यंत पोहोचू शकलो याचा आठवले यांनी आवर्जून उल्लेख केला. या वेळी पत्रकार कमलेश सुतार, धम्मगुरू भदंत वी रत्न थेरो, लोकशाहीर नंदेश उमप यांच्या हस्ते आठवले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत रणपिसे, देवेंद्र रणपिसे, महादू पवार आणि वरद विनायक बहू उद्देशीय सेवा संस्थेच्या अध्यक्षा श्रुती मनीष पाटील यांनी मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

