मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींची कुंडली तयार होणार

मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींची कुंडली तयार होणार
Published on

मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींची कुंडली तयार होणार
मालक-भाडेकरू कोण? इमारत किती जुनी, सदनिका, क्षेत्रफळाची मोजणी; म्हाडा प्राधिकरणाची मंजुरी, लवकरच एजन्सी नेमणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबई शहरात आठ-दहा दशकांहून अधिक जुन्या असलेल्या १३ हजार उपकर प्राप्त (सेस) इमारती असून आता म्हाडाकडून त्यांची कुंडली तयार केली जाणार आहे. वर्षानुवर्षे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळावी, त्यासाठीचे नियोजन करण्यासाठी त्यांची माहिती एका क्लिकवर मिळावी म्हणून म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून सेस इमारतीत किती मालक, भाडेकरू आहेत, त्याची मालकी कोणाकडे आहे, इमारत किती जुनी आहे, सदनिका किती आहेत, त्यांचे क्षेत्रफळ काय, याची इत्थंभूत माहिती गोळा केली जाणार आहे. त्याला म्हाडा प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.
मुंबईत सुरुवातीला १९ हजार ६४२ उपकरप्राप्त इमारती, चाळी होत्या. त्यापैकी आतापर्यंत १,६१७ इमारतींचा पुनर्विकास पूर्ण झाला असून म्हाडाने ४,३४० इमारतीच्या पुनर्विकासासाठी एनओसी दिली आहे. तसेच अद्याप १३ हजार ९१ इमारतीचा पुनर्विकास प्रलंबित आहेत. त्याचा पुनर्विकास घडवून आणण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील आहे; मात्र त्यासाठी इमारतीची जागा किती आहे, कधी उभारली आहे, त्याचे कोण मालक आहे, त्या इमारतीमध्ये किती सदनिका आहेत, त्यांचे क्षेत्रफळ किती, कायदेशीर भाडेकरू कोण आहे, सध्या वास्तव्यास कोण आहे, याची माहिती एकत्रितपणे उपलब्ध नाही. त्यामुळे सेस इमारतीच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे संक्रमण सदनिकांप्रमाणेच येथेही सर्वेक्षण करून संपूर्ण माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्यासाठी म्हाडा प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार एजन्सीच्या नियुक्तीसाठी लवकरच निविदा प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पुनर्विकासासाठी डेटा तयार होणार
सध्या सेस इमारतीचा पुनर्विकासाला गती मिळावी म्हणून म्हाडाकडून प्रयत्न सुरू आहे. तसेच समूह पुनर्विकासाच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे भाडेकरूची माहिती हाताशी असावी म्हणून म्हाडाने मालक आणि भाडेकरूंच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाबरोबरच इमारत, सदनिका, जागा आदींबाबत माहिती एकत्रित केली जाणार आहे.

अतिधोकादायक इमारतींवर वॉच
उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीची जबाबदारी म्हाडाची आहे. त्यानुसार म्हाडाकडून सातत्याने त्या इमारतींची दुरुस्ती केली जात असली तरी ज्या इमारतींची दुरुस्ती करणे शक्य नाही. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अतिधोकादायक जाहीर केल्या जातात; मात्र अनेकदा इमारत अतिधोकादायक जाहीर केल्यानंतरही भाडेकरू रिकामी करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे कोणती इमारत किती जुनी आहे, त्याची स्थिती काय, याची माहिती अद्ययावत केल्यास त्यावर लक्ष ठेवणे, आवश्यक उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटलाही गती
म्हाडाने फेब्रुवारीपासून उपकरप्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरुवात केली असून वर्षभरात १३ हजार इमारतींचे ऑडिट करण्याचे प्राधिकरणाचे लक्ष्य आहे. त्याची जबाबदारी १४२ ऑडिटरवर सोपवली आहे. याशिवाय या कामाला आणखी गती देण्यासाठी म्हाडा झोननुसार कंपन्यांची नियुक्ती करणार आहे.

एकूण इमारती
- सेस इमारतींची एकूण संख्या - १९ हजार ६४२
- आतापर्यंत पुनर्विकास - १ हजार ६१७
- पुनर्विकासासाठी म्हाडाकडून एनओसी - ४ हजार ३४०
- पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत - १३,०००
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com