करनिर्धारण-संकलन विभागात गैरव्‍यवहार

करनिर्धारण-संकलन विभागात गैरव्‍यवहार

Published on

करनिर्धारण-संकलन विभागात गैरव्‍यवहार

दक्षता विभागाच्या अहवालातून उघड; पालिका आयुक्तांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता. २३ : महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाचा तब्बल दाेन कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात चार अधिकाऱ्यांनी एका पक्षकाराची दाेन कोटींची शास्ती रद्द करण्यासाठी ७५ लाखांची लाच घेतल्याचा उल्लेख दक्षता विभागाच्या अहवालात करण्यात आला आहे. याबाबत लोकसेवा प्रहार महाराष्ट्र संघटनेने आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत दक्षता विभागाचे प्रमुख डी. गंगाधरन यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील तरे यांनी सांगितले, की कर निर्धारण आणि संकलन विभागातील अधिकारी संजय बेलदार, दत्तात्रय गिरी, महेश साळगावकर आणि देवयानी हडकर यांनी चुकीचे पुन:कर निर्धारण, अंतर्गत मंजुरीचा गैरवापर आणि वरिष्ठांपासून माहिती लपविणे असे गंभीर गैरप्रकार केल्याचे दक्षता विभागाच्या अहवालात नमूद आहे. या बदलांमुळे महापालिकेचे जवळपास एक काेटी ९७ कोटी रुपये नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले आहे.

मुख्य आरोपी महेश साळगावकर यांनी मुख्य कार्यालयात संबंधित प्रकरणासंबंधित बॅकएंड डेटा नष्‍ट केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हा प्रकार गंभीर असूनही संबंधित अधिकाऱ्यांना केवळ २० हजार ते ५० हजारांपर्यंतचा किरकोळ दंड ठोठावण्यात आल्याने कर्मचारी संघटनेने संताप व्यक्त केला आहे. काही इमारतींना मालमत्ता कर लागू करताना जाणीवपूर्वक सूट देण्यात आलेली आहे. या विभागातील काही अधिकारी पैसे घेऊन अशा प्रकारचे काम करीत असल्याचे आरोप अनेकदा झाले. या तक्रारीवरूनच दक्षता विभागाने अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना दोषी ठरवले होते.
-----
फाैजदारी गुन्हा दाखल करा!
लोकप्रहार सेवा संघटनेने आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात चौघांवर कठोर शिस्तभंग कारवाई करून बडतर्फ करावे, प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करावी, महेश साळगावकर यांचे महसूल विभागातील पदाेन्नती व बदली तत्काळ रद्द करावी, बॅकएंड डेटा नष्ट केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा मागण्या केल्या आहेत. यावर तत्काळ कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा तसेच न्यायालयीन लढाई लढू. त्याचप्रमाणे अधिवेशनातही यासंबंधी तारांकित प्रश्न उपस्थित केला जाणार आहे, असे तरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com