यू-डायसवर अद्याप अपूर्ण माहिती
यू-डायसवर अद्याप अपूर्ण माहिती
राज्यातील ५,३०२ शाळांकडून दिरंगाई
मुंबई, ता. २५ : यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्यक्षात किती विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले, त्यासोबतच शाळांमध्ये उपलब्ध असलेले शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर अद्ययावत अशी माहिती यू-डायस प्रणालीवर प्रत्यक्ष शाळांना भरणे बंधनकारक आहे; परंतु मुंबईसह राज्यातील तब्बल ५,३०२ शाळांनी अद्याप ही माहिती भरलेली नाही.
माहिती न भरणाऱ्या शाळांमध्ये मुंबई उपनगर महापालिकाअंतर्गत येणाऱ्या २२ शाळा आणि विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत येणारी एक शाळा अशा एकूण २३ शाळांचा समावेश आहे. एकूणच ही माहिती भरण्यासाठी या शाळांनी, याकडे दुर्लक्ष केल्याने यू-डायस प्रणालीचे कामकाजच लांबणीवर पडले असल्याचे शिक्षण विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आले. यामुळे या शाळांना अखेरची संधी म्हणून नोव्हेंबरअखेरपर्यंत ही माहिती भरण्यास मुभा दिली जाणार असल्याचे सांगण्यात येते.
यू-डायसवर शाळांची माहिती भरण्यामध्ये शहरी विभागापेक्षा ग्रामीण भागातील जिल्हे खूप मोठ्या प्रमाणात आघाडीवर असल्याचेही आकडेवारीवरून दिसून आले आहे. यामध्ये प्रामुख्याने भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे. दरम्यान, शहरी भागातील शाळांकडून मात्र मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत असल्याचे दिसून आले आहे. यू-डायस प्रणालीवर शाळांकडून भरल्या जात असलेल्या माहितीमध्ये एकूण १,०८,१६७ शाळांपैकी १,०२,८६५ शाळांनी आपली माहिती पूर्ण १०० टक्के भरली आहे, तर ५,३०२ शाळांनी अद्याप दिरंगाई केली आहे. यामुळे शालेय शिक्षण विभागाकडून शाळांची ही माहिती अद्ययावत करण्याचे काम तब्बल महिनाभर अधिक लांबले असल्याचेही शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शाळांच्या माहितीमुळे वित्तीय नियोजनापासून इतर उपक्रम राबवणे विभागाला सोपे होते.
...
आधार पडताळणी बाकी
राज्यातील २,०४,४४,९८२ विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण झाली आहे, तर उर्वरित ६०,०४०७ विद्यार्थ्यांची आतापर्यंत आधार पडताळणी बाकी आहे. यामध्ये अनेक तांत्रिक त्रुटींपासून ते काही अनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांना दोन ठिकाणी दाखवण्याच्या प्रकारामुळे या विद्यार्थ्यांची आधार पडताळणी होऊ शकली नसल्याचे शिक्षणतज्ज्ञांना वाटते.
...
अशा आहेत शाळा
एकूण शाळा : १,०८,१६७
माहिती न भरलेल्या शाळा : ५,३०२
माहिती पूर्ण भरलेल्या शाळा : १,०२,८६५
मुंबईतील अपूर्ण माहितीच्या शाळा : २३
आधार पडताळणी नसलेले विद्यार्थी : ६०,०४०७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

