दुबार मतदारांवरून मनसे पुन्हा आक्रमक

दुबार मतदारांवरून मनसे पुन्हा आक्रमक

Published on

दुबार मतदारांवरून मनसे पुन्हा आक्रमक
निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः मतदार याद्यांतील दुबार नावांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली असून प्रारूप मतदार यादीवरून त्यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत तब्बल ११ लाख दुबार नावे असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी याप्रकरणी टीकेची झोड उठवली आहे. अनेक मतदारांची नावे तीन ते चार ठिकाणी नोंदवली गेल्याचेही समोर आले असून, मनसेने पारदर्शकतेवर गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत.
बाळा नांदगावकर यांनी याबाबत सांगितले, की मनसेने गेल्या अनेक महिन्यांपासून हा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. ‘सत्याचा विराट मोर्चा’ काढून मतदार यंत्रणेमधील त्रुटी जनतेसमोर आणल्या होत्या. त्या वेळी सत्ताधारी पक्षातील अनेकांनी मनसेच्या आरोपांकडे दुर्लक्ष केले होते; परंतु आता खुद्द निवडणूक आयोगाने दुबार मतदारांची नावे असल्याचे मान्य केल्याने आपला दावा बळकट ठरत आहे. ‘मुंबईत दुबार मतदारांची समस्या आम्हीच सर्वप्रथम मांडली. आता खुद्द निवडणूक आयोगही हे स्पष्ट नाकारत नाही. निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या आकडेवारीने आमचे दावे सत्य ठरले आहेत,’ असेही त्यांनी म्हटले आहे. आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार दुबार नोंदींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात उपनगरांमध्ये आढळले आहे, पश्चिम उपनगर चार लाख ९८ हजार, पूर्व उपनगर तीन लाख २९ हजार आणि दक्षिण मुंबई दोन लाख ७३ हजार दुबार मतदार आहेत. या आकडेवारीवरून मुंबईतील जवळपास प्रत्येक विभागात मतदार याद्यांमध्ये मोठ्या चुका झाल्याचे स्पष्ट होते, असेही या वेळी सांगण्यात आले.
...
नावे वगळा!
दुबार मतदारांची एवढी प्रचंड संख्या असताना, प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना याची माहिती नसणे अशक्य असल्याची टीका नांदगावकर यांनी केली आहे. दुबार नावे वगळूनच मुंबई महापालिका निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मनसेची ठाम मागणी असल्याचे नांदगावकर यांनी म्हटले आहे.
...
बालेकिल्ले मुद्दामहून फोडले!
काही प्रभागांची फेररचना करण्यात आली आहे; मात्र यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे बालेकिल्ले मुद्दामहून फोडण्यात आल्याची टीकाही नांदगावकर यांनी केली. याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेऊन आवश्यक ते बदल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मनसेपाठोपाठ या विषयावर इतर विरोधकही आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com