डंपरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

डंपरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Published on

डम्परच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
मुंबई : सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्त्यावर भरधाव डम्परने दुचाकीस्वारास उडवले. रविवारी कुर्ल्याच्या हलव पूल परिसरात घडलेल्या अपघातात दुचाकी चालवणाऱ्या ६२ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी डम्परचालकाविरोधात गुन्हा नोंदवला. मृत वृद्धाचे नाव जी. फर्नांडिस असे असून डम्परच्या धडकेमुळे ते उजव्या बाजूस पडले आणि डम्परच्या मागील चाकाखाली चिरडले गेले. त्यांना तातडीने भाभा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com