मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली;

मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली;

Published on

सावधान... मुंबईची हवा अत्यंत खराब!
सकाळ, संध्याकाळ बाहेर जाणे टाळण्याची सूचना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले असून, काही भागात हवेचा स्तर ‘अत्यंत खराब’ श्रेणीत घसरली आहे. मुंबई प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आयआयटीएमच्या नोंदींनुसार, मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सरासरी १५० ते २६० दरम्यान नोंदवला गेला; परंतु अंधेरी (२५७), माझगाव (२५२), मालाड (२१९), कुलाबा (२१९), बोरिवली (२१७) आणि पवई (२१७) येथील हवा अत्यंत खराब होती.
हवेतील धूलिकण, वाहनांचा धूर, ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामे आणि हवामानातील थंड-कोरड्या परिस्थितीमुळे प्रदूषणात वाढ झाल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास बाहेर पडणे टाळावे, मास्कचा वापर करावा, तसेच श्वसनविकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असे उपाय हवामान विभागाने सूचवले आहे. मुंबईत थंडी आणि त्यात प्रदूषणाची पातळी वाढत असल्याने पुढील काही दिवस शहरात हवेची स्थिती आणखी बिघडू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
----
मुंबईतील प्रदूषणाची स्थिती
अंधेरी - २५७
माझगाव - २५२
मालाड - २१९
कुलाबा -२१९
पवई - २१७
बोरिवली - २१७
देवनार - १८३
बीकेसी - १६१
विलेपार्ले - १६०
कांदिवली - १५९
खेरवाडी बांद्रा - १५९
घाटकोपर - १५१
चेंबूर - १३८
वरळी - १२२
भांडुप - ११०
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com