६५वे राज्य कला प्रदर्शन सांगलीत

६५वे राज्य कला प्रदर्शन सांगलीत

Published on

६५वे राज्य कला प्रदर्शन सांगलीत
मंत्री चंद्रकांत पाटील यांची मान्यता

मुंबई, ता. २५ : कला संचालनालयाकडून दरवर्षी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. राज्य कला प्रदर्शन कलाकार विभाग व विद्यार्थी विभाग अशा दोन विभागांत स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येते. विद्यार्थी विभागाचे प्रदर्शन सांगली जिल्ह्यात फेब्रुवारी २०२६मध्ये आयोजित करण्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत मान्यता दिली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील शासनमान्य अशासकीय १९ अनुदानित कला महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक मंत्रालयात पार पडली. कला शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, की राज्यातील विद्यार्थी व कलाकार यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या प्रतिभाशक्तीला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कला संचालनालयाकडून दरवर्षी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. दरवर्षी राज्यात विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना संधी मिळावी आणि कला संस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही एका जिल्ह्यात प्रदर्शन होते. या वर्षी विद्यार्थी विभागाचे राज्य कला प्रदर्शन सांगली येथे फेब्रुवारी २०२६मध्ये होणार असून, राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कलाकृती सांगलीकरांसाठी खुल्या असणार आहेत. राज्य कला प्रदर्शनांतर्गत दिल्या जाणाऱ्या पुरस्कार व गौरव मानधनाच्या रकमेतील दर पाच वर्षांनी पाच टक्के वाढ करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.
...
मार्चमध्ये मुंबईत
कलाकार विभागाचे राज्य कला प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे १० ते १६ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com