सूर्यकांत मोरेंवर कारवाई करा; प्रवीण दरेकर
विधान परिषदेचा अवमान
सूर्यकांत मोरेंवर कारवाई करा; प्रवीण दरेकर, भारतीय यांची मागणी
मुंबई, ता. २५ ः विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, तसेच विधान परिषद सदस्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल शरद पवार गटाचे कार्यकर्ते सूर्यकांत मोरे यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची कारवाई करावी, अशी मागणी प्रवीण दरेकर व श्रीकांत भारतीय यांनी विधिमंडळाकडे केली आहे.
जामखेड नगर परिषदेच्या निवडणूक प्रचार सभेत बोलताना रविवारी (ता. २३) सूर्यकांत मोरे यांनी विधान परिषद, विधान परिषदेचे सदस्य व परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक भाषेत वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे विधान परिषदेची अप्रतिष्ठा झाली असून, मोरे यांच्यावर विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मोरे यांनी विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह विधान परिषदेचा तसेच प्रत्येक विधान परिषद सदस्याचा अपमान केला असून, विधान परिषदेचे सर्व सदस्य, सभापती, विधान परिषदेबद्दल असत्य, दिशाभूल करणारी माहिती देत सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला आहे, असे दरेकर यांनी दाखवून दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

