गुब्बी ज्वालामुखीमुळे एअर इंडियाची तीन उड्डाणे रद्द

गुब्बी ज्वालामुखीमुळे एअर इंडियाची तीन उड्डाणे रद्द

Published on

मुंबईतील अनेक विमानांना लेटमार्क
मुंबई, ता. २५ ः ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आकाशात पसरलेली राख भारताकडे सरकल्याने त्याचा परिणामी देशातील हवाईसेवेवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सर्व विमान कंपन्यांना अलर्ट जारी केला. तसेच, आवश्यकता वाटल्यास ऑपरेशन तात्पुरते थांबवण्याचेही निर्देशही दिले. मुंबई विमानतळाच्या विमानसेवेलादेखील याचा फटका बसला असून, एअर इंडियाची तीन उड्डाणे मंगळवारी (ता. २५) रद्द केली होती. तर अनेक विमानांना लेटमार्क लागला. हवेतील राखेमुळे दृश्यमानता कमी झाल्याने काही विमान कंपन्यांनी सोमवार (ता. २४) दुपारपासूनच फ्लाइट्स रद्द केल्या. मंगळवारी एअर इंडियाने चेन्नई ते मुंबई, मुंबई ते हैद्राबाद, मुंबई ते कोलकाता विमानांचे उड्डाण रद्द केले होते. त्यामुळे या विमानांचे बुकिंग असलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. तसेच काही विमानांना लेटमार्क लागल्याने प्रवाशांना विमानतळावरच बराच वेळ ताटकळावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com