मतदार यादीतील गोंधळ दूर करा

मतदार यादीतील गोंधळ दूर करा

Published on

मतदार यादीतील गोंधळ दूर करा
निवडणूक आयोगाचे पालिकांना आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील वाढत्या त्रुटींवर राज्य निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी आता थेट महापालिका आयुक्तांवर टाकली आहे. प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर नावे चुकीच्या प्रभागात, दुबार आणि लेखनिक चुका आढळल्यानंतर आयोगाने महापालिकांना तातडीचे आणि कडक आदेश जारी केले आहेत.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही त्रुटी समोर येत असल्याचे समोर आल्यानंतर आयोगाने स्पष्ट केले आहे, की महापालिका प्रशासनाने स्यू-मोटो दुरुस्ती करावी आणि अंतिम मतदार यादी निर्दोष करावी. महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर नावे चुकीच्या प्रभागात गेल्याच्या तक्रारी आयोगाच्या निदर्शनास आल्या आहेत. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खातरजमा करावी आणि योग्य प्रभागात नावे दाखल करावीत, असे आदेश आयोगाने महापालिकांना पत्र लिहून दिले आहेत. अंतिम मतदार यादी पूर्णतः अचूक, त्रुटीरहित आणि पारदर्शक असावी, असा स्पष्ट आदेश आयोगाने दिला आहे. या सर्व उपाययोजना तत्काळ राबवण्याचे निर्देश आयोगाचे उपसचिव सुरेश काकाणी यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
...
हरकतींची त्याच दिवशी छाननी
दररोज मिळणाऱ्या हरकतींची त्याच दिवशी किंवा पुढील दिवशी छाननी करून निपटारा करावा, असेही निर्देश आहेत. शेवटच्या दिवशी ताण येऊ नये म्हणून ही प्रक्रिया वेगाने करण्याचा आदेश आयोगाने पुन्हा अधोरेखित केला आहे.
...
मतदार शोध अनिवार्य
मतदारांना आपले नाव योग्य प्रभागात आहे का, हे सहज तपासता यावे यासाठी महापालिकांनी स्वतःच्या वेबसाइटवर https://mahasecvoterlist.in या संकेतस्थळावरील ‘Search name in voters list’ ही लिंक अनिवार्यपणे उपलब्ध करून देण्याचे निर्देश जारी केले आहेत.
...
दुबार मतदारांची तपासणी अंतिम टप्प्यात
निवडणूक आयोगाने २९ ऑक्टोबरला दिलेल्या सूचनांनुसार दुबार नावे मतदान केंद्रनिहाय यादी जाहीर होण्यापूर्वीच वगळणे बंधनकारक आहे. मतदान केंद्र यादी प्रकाशित करताना दुबार नावे दिसणे गरजेचे असल्याने त्याचे सर्व काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आहेत.
...
सहाय्यता केंद्र सुरू करा!
ज्या नागरिकांना ऑनलाइन नाव शोधणे शक्य नसते त्यांच्यासाठी मुख्यालय व प्रभाग कार्यालयांत मतदार सहाय्यता केंद्र सुरू करणे, दुबार नाव असणाऱ्यांसाठी अर्ज भरून देण्याची सुविधा, आवश्यक कागदपत्रांची माहिती देणे या सेवा अनिवार्यपणे सुरू करण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com