रस्ते दुरुस्ती कामांचा शाळांच्या बसना फटका!

रस्ते दुरुस्ती कामांचा शाळांच्या बसना फटका!

Published on

रस्ते दुरुस्ती कामांचा शाळांच्या बसना फटका!
संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : राज्यभर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांबद्दल शाळेच्या बस मालक संघटनेने सोमवारी (ता. २४) गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या कामांमुळे शाळेच्या बससेवा मोठ्या प्रमाणात बाधित झाल्या आहेत. संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे.
या निवेदनात म्हटले आहे, की मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला उशीर होत आहे. काही विद्यार्थ्यांना तर परीक्षासुद्धा देता आली नाही. स्कूल बस ओनर्स असोसिएशन अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले, की गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याचे बांधकाम कोणतीही पूर्वसूचना न देता केले जात आहे. त्यामुळे शाळा बससेवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे, अनधिकृत पार्किंग आणि वारंवार होणारे गॅस व पाइपलाइन खोदकाम यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. गर्ग म्हणाले, की काही रस्त्यांवर सोडून दिलेली वाहने उभी आहेत, ज्यामुळे शाळेच्या बस आणि व्हॅन चालवणे अवघड जाते. बांधकाम व्यावसायिक सार्वजनिक रस्त्यांवर आपले साहित्य ठेवतात, त्यामुळे मुलांना शाळेत जाण्यास आणि परत येण्यासाठी जास्त वेळ लागतो.
...
खराब रस्त्यांमुळे बसचा मेंटेनन्स खर्च चार पट वाढला आहे. अनेक ड्रायव्हर व महिला सहाय्यकांनी नोकऱ्या सोडल्या आहेत. पालकांना आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल भीती वाटते आहे. या सर्व समस्यांचा विचार करून संघटनेने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी विनंती केली आहे.
- अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com