जलवाहिनी बदलण्यासाठी १५ टक्के पाणीकपात
जलवाहिनी बदलण्यासाठी १५ टक्के पाणीकपात
३, ४ डिसेंबरला पाणीपुरवठ्यावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने बुधवारी (ता. ३) सकाळी १० वाजल्यापासून गुरुवारी (ता. ४) सकाळी १० वाजेपर्यंत एकूण १४ प्रशासकीय विभागांमध्ये पाणीपुरवठ्यात १५ टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.
तानसा धरणातून भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी २,७५० मिलिमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी अंथरण्याकामी काही कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी साधारणतः २४ तासांचा कालावधी आवश्यक आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई शहर विभागातील ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्तर विभाग, पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य विभाग तसेच पूर्व उपनगरातील एल आणि एस विभाग अशा एकूण १४ प्रशासकीय विभागांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात केली जाणार आहे.
पाणी जपून वापरावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

