म्हाडाच्या गाळ्यासाठी आजपासून नोंदणी
म्हाडाच्या गाळ्यासाठी आजपासून नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील ८४ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता ऑनलाइन नोंदणी व अर्ज प्रक्रियेला गुरुवार (ता. २७)पासून सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेला सकाळी ११ वाजल्यापासून प्रारंभ होणार आहे.
या लिलावात मुंबईतील मुलुंड गव्हाणपाडा येथीस चार अनिवासी गाळे, कुर्ला-स्वदेशी मिल येथे पाच, कोपरी पवई येथे १५, मॉडेल टाऊन मजासवाडी जोगेश्वरी पूर्व येथे एक, सिद्धार्थनगर गोरेगाव येथे एक, बिंबिसारनगर गोरेगाव पूर्व येथे १७ अनिवासी गाळे, मालवणी मालाड येथे २९ अनिवासी गाळे, चारकोप येथे १२ अनिवासी गाळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. २३ डिसेंबरला सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. २४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
...
२१ डिसेंबरपर्यंत मुदत
या ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी https://eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाइन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाइन भरणे यासाठी गुरुवारी (ता. २७) सकाळी ११ वाजल्यापासून ते २१ डिसेंबरच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

