अतिक्रमणमुक्त जमिनीवर वाचनालये, उद्याने उभारा!
अतिक्रमणमुक्त जमिनीवर वाचनालये, उद्याने उभारा!
मुंबई, ता. २६ : मुंबईतील अतिक्रमणमुक्त केलेल्या ५०० एकर जमिनीचा ताबा घेऊन त्यावर जनतेसाठी वाचनालय, अभ्यासिका, व्यायामशाळा, उद्याने, मनोरंजन केंद्रे उभारावीत, असे निर्देश मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
मुंबईत मानखुर्द, कुर्ला, गोवंडी या भागांतही मोठ्या प्रमाणावर अनेक बांधकामे असून, तेथील अधिकाऱ्यांनीदेखील या सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात मोहीम उभारावी, असे निर्देशही लोढा यांनी या वेळी दिले. या विषयावर आज लोढा यांनी उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. मालवणीतील नऊ हजार चौरस मीटर जमीन प्रशासनाने नुकतीच अतिक्रमणमुक्त केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत हजारो एकर जमिनीवर अतिक्रमण आहे. त्यामुळे मुंबईकरांना प्राथमिक सुविधा देणे प्रशासनाला अवघड जात आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अतिक्रमणमुक्त ५०० एकर जमिनीची नोंद घेऊन त्यावर सेवाभावी आणि सामाजिक संस्थांसह विधायक उपक्रम राबवले जातील, असेही लोढा म्हणाले.
...
विधायक उपक्रम...
मुंबईच्या उपनगरांतील मोकळ्या जमिनींची वर्गवारी करून तेथे विधायक उपक्रम राबवण्यासाठी प्रशासन कार्यवाही करेल, असे जिल्हाधिकारी कटियार म्हणाले. तर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पोलिस उपायुक्त संदीप जाधव यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

