सोलापूरला जागतिक गारमेंट हब बनविणार : राहुल नार्वेकर
सोलापूरला जागतिक गारमेंट हब बनविणार : राहुल नार्वेकर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : सोलापूरला कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, सोलापूरला जागतिक गारमेंट हब बनविण्याचा निर्धार केल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे बुधवारी (ता. २६) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते नववा आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर २०२५चा शुभारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. माजी वस्त्रोद्योगमंत्री आणि आमदार सुभाष देशमुख यांनी हे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा मानस व्यक्त केला. सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे चेअरमन अजय रंगरेज यांनी सांगितले, की हे प्रदर्शन खरेदीदार आणि वितरकांतील प्रभावी बिझनेस टू बिझनेस प्लॅटफॉर्म ठरत असून, भारतीय युनिफॉर्म उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. सोलापूरपासून सुरू झालेल्या या उपक्रमाने भारतातील गारमेंट उद्योगास ‘मेक इन इंडिया’च्या दिशेने नवा वेग दिला आहे.
सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनात १५०हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड सहभागी झाले आहेत. ३० हजार युनिफॉर्म डिझाइन्स, १५ हजार फॅब्रिक इनोव्हेशन्स आणि ‘एआय’आधारित व्हर्च्युअल फॅशन शो हे प्रमुख आकर्षण ठरले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

