छत्रपती शिवराय, झाशीची राणी यांचा लढा मनामनात भरवा

छत्रपती शिवराय, झाशीची राणी यांचा लढा मनामनात भरवा

Published on

शिवराय, झाशीच्या राणीचा लढा तरुणांच्या मनात भरवा
जम्मू-काश्मीरच्या आमदार शगुन परिहार यांचे आवाहन
मुंबई, ता. २७ : राष्ट्रविरोधी अतिरेक्यांविरुद्धचा लढा जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांचा लढा आपल्या मुलांच्या मनामनात भरवणे आवश्यक आहे, असे मत जम्मू-काश्मीरच्या सर्वात तरुण आमदार शगुन परिहार यांनी व्यक्त केले. ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित पाचव्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक परिसंवादात त्या बोलत होत्या. या परिसंवादात निवृत्त आयपीएस अधिकारी मदन ओबेरॉय पॅट्रियट नेटवर्कचे अध्यक्ष एंझो एलियास, सनदी अधिकारी ब्रिजेश सिंह आदी सहभागी झाले होते.
तिसरी नापास झालेले अतिरेकी तरुण अनुयायांना भडकवून आजची पिढी बिघडवत आहेत. याविरोधात शिवराय आणि झाशीच्या राणीचा लढा तरुणांच्या मनामनात भरून अतिरेक्यांचे डावपेच विफल करावे लागतील, असे शगुन परिहार म्हणाल्या.
युरोपात मुस्लिम निर्वासितांमुळे अलगतावाद वाढत असून, लोकसंख्या बदल आणि राजकीय वर्चस्वाच्या माध्यमातून अतिरेकी वृत्ती युरोपवर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. याविरोधात सर्वांनी एकत्र लढा द्यावा, असे आवाहन एंझो एलियास यांनी केले.
लाल किल्ला बॉम्बस्फोटाच्या निमित्ताने पाकिस्तान स्थानिक अतिरेकी जाळे वापरत असल्याचे दिसले. अतिरेक्यांचा अर्थपुरवठा आदींवर सतत देखरेख ठेवणे आवश्यक आहे, असे मत ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.
अतिरेकीवादासाठी तरुणांच्या डोक्यात ‘प्रोग्रॅम’ फीड करण्यासाठी एआयचा वापर होत आहे. याविरोधात आपणही एआयचा वापर करून अशा प्रवृत्ती आणि त्यांना जाळ्यात ओढणाऱ्या अनुयायांचा शोध घ्यावा, असे मदन ओबेरॉय यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com