मुंबईत साेमवारपासून ३० तास पाणीबाणी
मुंबईत साेमवारपासून ३० तास पाणीबाणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : घाटकोपर येथील तीन हजार मिमीच्या मुख्य जलवाहिनीवर अडीच हजार मिमी जलवाहिनीची जोडणी करण्याचे महत्त्वाचे काम पालिकेने हाती घेतली आहे. अमर महल बोगदा शाफ्टला जोडण्यासाठी हे काम आवश्यक असून, या कामामुळे १ डिसेंबरला सकाळी १० ते २ डिसेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत ३० तास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
शहरातील अनेक विभागांत या कालावधीत कमी दाबाने पाणी येणार असून, काही ठिकाणी पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ए विभाग, बी विभाग, सी विभाग, ई विभाग, एफ दक्षिण, एफ-उत्तर, एम पूर्व, एम पश्चिम, एल विभाग, एस विभाग आणि एन विभाग (पूर्व उपनगर) या विभागांना प्रामुख्याने फटका बसणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

