मृत गौरीसह गर्जेच्या 
शरीरावरदेखील जखमा

मृत गौरीसह गर्जेच्या शरीरावरदेखील जखमा

Published on

मृत गौरीसह गर्जेच्या शरीरावरही जखमा
पोलिसांची न्यायालयाला माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मृत डॉ. गौरी पालवे आणि आरोपी पती अनंत गर्जे या दोघांच्याही शरीरावर जखमा आढळल्या आहेत. शिवाय घटनेपूर्वी दोघांमधील कॉल रेकॉर्डिंग हाती लागले आहे. त्यावरून डॉ. गौरी यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली हे तपासावे लागेल, अशी माहिती गुरुवारी वरळी पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयाला दिली.
डॉ. गौरी पालवे आत्महत्याप्रकरणी आरोपी अनंतची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यास वरळी पोलिसांनी गुरुवारी दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. मृत्यूनंतर केलेल्या पंचनाम्यात डॉ. गौरी आणि अटकेनंतर केलेल्या वैद्यकीय चाचणीत आरोपी अनंतच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या. अनंतने डॉ. गौरीसोबत मोबाइलद्वारे झालेले संभाषण रेकॉर्ड केले होते. ते पोलिसांच्या हाती लागले आहे. या संभाषणाची तपासणी केली जाईल. या संवादासह अन्य पुरावे गोळा करून डॉ. गौरी यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याचा तपास केला जाईल. शिवाय गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेल्या अनंत यांच्या दोन भावंडांचा शोधही सुरू असून, त्यांना अटक करण्यासाठी अनंतच्या पोलिस कोठडीत १० दिवसांची वाढ करावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली. त्यावर आरोपीचे वकील ॲड. मंगेश देशमुख यांनी या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, सत्य समोर यावे, या उद्देशाने अनंतने शरणागती पत्करली. ते पोलिसांना संपूर्ण सहकार्य करीत आहेत. केवळ किती दिवसांची पोलिस कोठडी द्यावी याचा निर्णय न्यायालयाने घ्यावा, असे युक्तिवादात स्पष्ट केले. त्यावर न्यायालयाने अनंतला २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com