पालिकेची आजपासून धूळ नियंत्रण माेहीम
पालिकेची आजपासून धूळ नियंत्रण माेहीम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : शहर व उपनगरे क्षेत्रात वायुप्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने महापालिकेने २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’ राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कनिष्ठ पर्यवेक्षकांनी दत्तक घेतलेल्या रस्त्यांवर ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.
मोहिमेंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कनिष्ठ पर्यवेक्षकांनी दत्तक घेतलेल्या रस्त्यांवर सखोल स्वच्छता करण्यास प्राधान्य द्यावे. यासाठी पाण्याचे टँकर, मिस्टिंग मशीन तसेच अन्य यांत्रिक उपकरणे आणि संयंत्रांचा वापर करावा. यामुळे बोरिवली (पूर्व), मालाड (पश्चिम), चकाला-अंधेरी (पूर्व), देवनार, माझगाव, नेव्हीनगर-कुलाबा, मुलुंड (पश्चिम), पवई या परिसरातील वायू निर्देशांकांत सुधारणा हाेण्याच्या दृष्टीने ही स्वच्छता करावी. विभाग स्तरावर कार्यरत असलेले घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी या संपूर्ण मोहिमेवर देखरेख ठेवावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

