सरकारी रुग्णालयातील डॉक्टर महापालिकेतही कार्यरत!

सरकारी रुग्णालयातील डॉक्टर महापालिकेतही कार्यरत!
Published on

सरकारी रुग्णालयातील डॉक्टर महापालिकेतही कार्यरत!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. खालिद अन्सारी हे मुंबई महापालिकेच्या एफ नॉर्थ विभागातील शांतीनगर ‘आपला दवाखाना’ येथेही कार्यरत असल्याचे समोर आले आहे. सरकारी नियमांनुसार हे चुकीचे आहे.
याबाबत डॉ. खालिद यांनी, ‘मी गेल्या १५ वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर काम करत होतो,’ असे म्हटले आहे. २०२४च्या डिसेंबर महिन्यात सरकारी रुग्णालयातील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी म्हणून माझी कायम नियुक्ती झाली. नॉन प्रॅक्टिस अलाऊन्स मिळत नसल्याने दोन ठिकाणी काम करता येत नाही, हा नियम माहिती नव्हता. मी सकाळी सरकारी रुग्णालयात आणि रात्री महापालिकेच्या क्लिनिकमध्ये काम केले आणि कुठेही कामात कुचराई केलेली नाही. नियम समजताच मी सप्टेंबरमध्ये महापालिकेच्या आपला दवाखाना याठिकाणी राजीनामा दिला, असे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार असल्याचे सांगितले.
सरकारी नियमानुसार शासकीय रुग्णालयातील कोणत्याही डॉक्टरला दुसऱ्या ठिकाणी, विशेषतः महापालिकेत किंवा खासगी क्षेत्रात काम करण्याची परवानगी नसताना डॉ. अन्सारी यांनी २०२३ ते सप्टेंबर २०२५ पर्यंत पालिकेच्या क्लिनिकमध्ये काम केल्याचे आढळले. या कालावधीत त्यांच्या बँक खात्यात पालिकेकडून सुमारे ३४ लाख रुपयांचे मानधन मिळाल्याची नोंद आहे. डॉ. अन्सारी कायमस्वरूपी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी म्हणून सरकारी रुग्णालयात कार्यरत असताना महापालिकेतील सेवाही देत होते, ही बाब पुढे आल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com