‘पीएमजीपी’च्या रहिवाशांना १ जानेवारीपासून भाडे मिळणार
मुंबई : पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या जोगेश्वरी पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडा स्वत: करणार आहे. त्यानुसार येथील रहिवाशांना १ जानेवारीपासून घरभाडे दिले जाणार आहे. तसेच जानेवारीअखेरपर्यंत संबंधित रहिवाशांनी घरे रिकामी करावीत, म्हणून म्हाडाकडून प्रयत्न सुरू आहेत. येथील १० क्रमांकाच्या इमारतीची पाण्याची टाकी दोन दिवसांपूर्वी कोसळली. त्यामुळे रहिवाशांना तातडीने भाडे देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्वसन व विक्री घटकाचे बांधकाम करण्यासाठी म्हाडाने राज्य सरकारकडून अंतिम मंजुरी घेतली आहे. तसेच प्रकल्पासाठी ईपीसी कंत्राटदार म्हणून बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड केली आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाकडून येथील रहिवाशांना २० हजार रुपये मासिक भाडे दिले जाणार आहे. किमान २५ हजार रुपये भाडे दिले जावे, अशी रहिवाशांची मागणी आहे. त्यामुळे म्हाडा काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

