हरकती, सूचनांची तत्काळ दखल घ्या!

हरकती, सूचनांची तत्काळ दखल घ्या!

Published on

हरकती, सूचनांची तत्काळ दखल घ्या!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : महापालिका निवडणूक २०२५ अनुषंगाने प्रसिद्ध झालेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवरील हरकती आणि सूचनांची काटेकोर दखल घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
१ जुलै २०२५नुसार आधारित असलेल्या या मतदार यादीत जर कोणाचे नाव चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाले असल्याची हरकत प्राप्त झाली, तर सक्षम अधिकाऱ्यांनी तत्काळ स्थळपाहणी करून खातरजमा करावी आणि अंतिम निर्णय द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. या अनुषंगाने आज भायखळा येथील पेंग्विन कक्षात बैठक घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, निवडणूक अधिकारी विजय बालमवार, वरिष्ठ अधिकारी आणि विभागीय कर्मचारी उपस्थित होते. मतदार सुविधेसाठी महापालिकेच्या मुख्यालयासह २४ विभागांत मतदार सहाय्यता केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम तारीख ३ डिसेंबर २०२५ असून त्यांचा निपटारा पारदर्शकपणे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टंकलेखनाच्या चुका, चुकीच्या प्रभागातील नावे, मृत व्यक्तींची नावे किंवा दुबार नोंदी अशा सर्व बाबींची नोंद घेऊन दुरुस्ती करूनच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी, असेही निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com