वादग्रस्त सहाय्यक आयुक्त 
महिनाभर सक्तीच्या रजेवर

वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महिनाभर सक्तीच्या रजेवर

Published on

वादग्रस्त सहाय्यक आयुक्त
महिनाभर सक्तीच्या रजेवर

‘सकाळ’च्या दणक्यानंतर महापालिकेची कारवाई

मुंबई : अपहरण, खंडणीच्या मागणीसह शासकीय अधिकाऱ्यांना तथाकथित पुनर्विकास प्रकल्पांत कोट्यवधींची गुंतवणूक रोखीने करण्यास भाग पाडल्याचा आरोप असलेल्या सहाय्यक आयुक्ताला शुक्रवारी (ता. २८) महापालिकेने महिनाभर सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने या वृत्तास दुजोरा दिला असून, ‘सकाळ’च्या वृत्ताची दाखल घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचे या विभागाने सांगितले.

संबंधित सहाय्यक आयुक्ताला वादग्रस्त पार्श्वभूमी असून, कोविडकाळात या अधिकाऱ्याने १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्याबाबतची चौकशी पालिका पातळीवर सुरू आहे. निशित पटेल या ब्रिटिश नागरिकाने मुंबई पोलिस आयुक्तांसह महापालिकेकडे संबंधित सहाय्यक आयुक्तासह दोन शासकीय अधिकारी, हॉटेल व्यावसायिक आणि दोन अनोळखी बाउन्सरविरोधात लेखी तक्रार केली होती. या व्यक्तींनी अपहरण करून बेदम मारहाण केली. तसेच बंदुकीच्या धाकाने ६० कोटी रुपयांची खंडणी मागितली, असा आरोप पटेल यांनी केला होता. या तक्रारीआधारे गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, ‘सकाळ’ने पटेल यांना झालेल्या मारहाणीपासून शासकीय अधिकाऱ्यांची काळी गुंतवणूक, त्यातील आर्थिक गैरव्यवहार, बनावट कागदपत्रे इत्यादीबाबत वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती.

सहाय्यक आयुक्ताची चौकशी
संबंधित सहाय्यक पालिका आयुक्त शुक्रवारी सुमारे तीन तास भायखळा येथील गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षात होते. पटेल यांच्या तक्रारीबाबत त्यांच्याकडे याआधीही चौकशी करण्यात आली होती. चौकशीनिमित्त त्यांना पुन्हा कक्ष कार्यालयात बोलावण्यात आले होते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

वांद्रे पोलिसांनीही नोंदवला जबाब
वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी तक्रारदार पटेल यांचा सविस्तर जबाब नोंदवला. त्यामुळे या तक्रारीचा तपास वांद्रे पोलिसांकडूनही सुरू होईल, असे संकेत मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com