प्रभागनिहाय आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध

प्रभागनिहाय आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध
Published on

प्रभागनिहाय आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता प्रभागनिहाय अंतिम आरक्षण आज शुक्रवारी (ता. २८) रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५साठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी मंगळवारी (ता. ११) सोडत काढण्यात आली. त्यानुसार, महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीच्या एकूण २२७ जागांपैकी अनुसूचित जातीसाठी १५, अनुसूचित जमातींसाठी दोन, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता ६१ जागा राखीव झाल्या. एकूण २२७ जागांपैकी ११४ जागा महिलांसाठी राखीव झाल्या. यापैकी आठ जागा अनुसूचित जाती (महिला), एक जागा अनुसूचित जमाती, ३१ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), तर ७४ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com