सायन-पनवेल टी- जंक्शन फ्लायओव्हर प्रकल्पात ५०० कोटींची वाढ

सायन-पनवेल टी- जंक्शन फ्लायओव्हर प्रकल्पात ५०० कोटींची वाढ

Published on

सायन-पनवेल टी-जंक्शन फ्लायओव्हर प्रकल्पात ५०० कोटींची वाढ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : सायन-पनवेल महामार्गाजवळील महाराष्ट्र नगरातील टी-जंक्शनवर प्रस्तावित फ्लायओव्हर प्रकल्पाच्या बांधकाम खर्चात तब्बल ५०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अटी, पाइलिंगमध्ये अस्तित्वातील पाणीपुरवठा व मलनिस्सारण यंत्रणा यांचा अडथळा आणि फ्लायओव्हरच्या संरचनात्मक बदलांमुळे खर्चात वाढ झाल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले असून, महापालिकेने सुधारित वाढीव खर्चाला मंजुरी दिली आहे.

या कामाच्या मूळ कंत्राटाची किंमत १२३४.९० कोटी रुपये होती, तर सुधारित आराखड्यानुसार वाढीव कामांसह एकूण कंत्राट रक्कम आता १७२५.१२ रुपये कोटी झाली आहे. यामुळे प्रकल्पाच्या खर्चात ४९०.२२ कोटींची वाढ झाली आहे. यामध्ये स्टेनलेस स्टील, काँक्रीट आणि स्टील सळ्यांमध्ये वाढ करून संरचनात्मक बदल समाविष्ट केले गेले आहेत.
_______

जानेवारी २०२८पर्यंत अंतिम मुदत
मूळ कंत्राट कालावधी ३० महिने असला तरी अडथळे व अतिरिक्त कामामुळे तो ३९ महिन्यांपर्यंत वाढवून १३ जानेवारी २०२८ पर्यंत करण्यात आला आहे. प्रकल्प सल्लागार मे. टी. पी. एफ. इंजिनिअरिंग प्रा. लि. यांनी सुधारित आराखडा तयार केला, तर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी बॉम्बे) यांनी पुन्हा आढावा करून तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.
---------
वाहतूक कोंडी कमी होणार
महापालिकेच्या मते, फ्लायओव्हर आर्म-१ घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरून वाशीकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करेल, तर आर्म-२ वाशीकडून जीएमएलआरवर जाण्यासाठी दुसऱ्या स्तरावर मार्ग निर्माण करेल. यामुळे टी-जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होईल., प्रवासाचा वेळ व इंधनाचा खर्च घटेल तसेच वायुप्रदूषण कमी होईल. मात्र या वाढीव खर्चामुळे महापालिकेवर आर्थिक जबाबदारी वाढली असून, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कार्यक्षम व्यवस्थापन आणि तपासणी गरजेची आहे.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com