वृद्ध दाम्पत्याच्या ३५ कोटींच्या शेअर्सचा अपहार

वृद्ध दाम्पत्याच्या ३५ कोटींच्या शेअर्सचा अपहार

Published on

वृद्ध दाम्पत्याच्या ३५ कोटींच्या शेअर्सचा अपहार
मुंबई : वृद्ध दाम्पत्यास वारसा हक्काने प्राप्त झालेल्या सुमारे ३५ कोटी मूल्य असलेल्या समभागांचा अपहार केल्याप्रकरणी वनराई पोलिसांनी २६ नोव्हेंबरला ग्लोब कॅपिटल मार्केट या कंपनीविरोधात गुन्हा नोंदवला. गिरगाव येथे राहणाऱ्या भरत शहा (७२) यांच्या तक्रारीआधारे ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे असलेले कोट्यवधी रुपयांचे शेअर शहा व त्यांच्या पत्नीस वारसा हक्काने प्राप्त झाले; मात्र शेअर ट्रेडिंगबाबत माहिती नसल्याने त्यांनी एका मित्राच्या सल्ल्याने ग्लोब कॅपिटल मार्केट कंपनीची मदत घेतली. शहा यांच्या आरोपांनुसार कंपनीने हे शेअर गहाण ठेवून प्राप्त रक्कम चुकीच्या पद्धतीने गुंतवली. विशेष म्हणजे बनावट वार्षिक विवरणपत्र पाठवून ३५ कोटींचे नुकसान झाले असून, ते आपण कंपनीला देणे लागतो, असे भासवले. ही रक्कम न भरल्यास ३५ कोटींचे शेअर विकून ती वसूल केली जाईल, अशी सूचना देण्यात आली. ती खरी मानून शहा यांनी अन्य सल्लागारांच्या मदतीने स्वतः शेअर विकून कंपनीला ३५ कोटी रक्कम अदा केली. प्रत्यक्ष मात्र विवरण पत्रात या व्यवहारांबाबत तफावत आढळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com