आनंद करंदीकर यांनी समाजाच्या विविध घटकांसाठी आयुष्य झोकून दिले- डॉ. भालचंद्र मुणगेकर
आनंद करंदीकर यांनी समाजाच्या विविध घटकांसाठी आयुष्य झोकून दिले - डॉ. भालचंद्र मुणगेकर
मुंबई, ता. २९ : आयआयटीसारख्या शिक्षण संस्थांमध्ये शिकूनही डॉ. आनंद करंदीकर यांनी भारतीय समाजाच्या वेगवेगळ्या घटकांचे संबंध, त्याचे आधारस्तंभ यांच्यावर काम केले. एखाद्या गोष्टीवर झपाटून काम करणे ही त्यांच्या कामाची पद्धत होती. त्यांचे हे कार्य आताच्या देशातील एकूण परिस्थितीत खूप महत्त्वाचे असल्याचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज डॉ. करंदीकर यांच्या अभिवादन सभेत सांगितले. तसेच त्यांचे आताच्या स्थितीत सोडून जाणे ही समाजाची मोठी हानी असल्याचेही ते म्हणाले.
विचारवेधचे प्रणेते, पुरोगामी विचारवंत डॉ. आनंद करंदीकर यांच्यासाठी अभिवादन सभा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृह येथे पार पडली. या वेळी डॉ. मुणगेकर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. या वेळी मुंबईतील युवक क्रांती दल, राष्ट्र सेवा दल आणि पुरोगामी संघटनांचे प्रतिनिधी, साहित्यिक, विचारवंत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला करंदीकर यांनी तंत्रज्ञान, विज्ञान आणि ब्रह्मज्ञान या विषयावर केलेल्या आणि अखेरच्या विचारवेध संमेलनातील त्यांच्या भाषणाच्या चित्रफीत आणि त्यातील काही अंश दाखवण्यात आला. अभिवादन सभेत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी माझी करंदीकर यांच्याशी पहिली भेट गुजरातमध्ये झाल्याचे सांगत त्यांनी सेवा दल आणि इतर ठिकाणी झालेल्या संमेलनांतील आठवणीना उजाळा दिला.
_______
करंदीकर यांच्या आठवणींना उजाळा
आनंद करंदीकर यांच्या पत्नी सरिता यांनी त्यांच्यासोबत असलेले वैचारिक आणि कौटुंबिक नाते, त्यांच्या आठवणी सांगितल्या. महिलांच्या रोजगार आणि शिक्षणावर त्यांची असलेली दृष्टी यावर केलेल्या चर्चा याबाबत माहिती दिली. माजी खासदार हुसेन दलवाई यांनी विचारवेध संमेलन सुरू झाल्यानंतरच्या संवाद आणि आठवणी सांगितल्या. त्यांनी विचारवेध सुरू केले. त्यांच्यानंतर ते सुरू राहण्यासाठी कोणीतरी जबाबदारी घेण्याची गरज व्यक्त केली. मोहन थोरात यांनी या वेळी आनंद करंदीकर यांच्याबाबत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेले निवेदन वाचून दाखवले. रवींद्र केसकर, रेखा ठाकूर, शमा दलवाई, प्रताप आसबे आदींनीही करंदीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

